ख्रिस्ती जीवन
‘शेवटच्या दिवसांमध्ये’ विपत्तींचा सामना करण्यासाठी तयार राहा
आज आपण ‘शेवटच्या दिवसांच्या’ अगदी शेवटल्या टप्प्यात जगत आहोत. त्यामुळे समस्या आणखी वाढत जातील अशी अपेक्षा आपण करू शकतो. (२ती ३:१; मत्त २४:८) जेव्हा एखादी नैसर्गिक विपत्ती येते, तेव्हा आपला जीव वाचवण्यासाठी यहोवाची संघटना आपल्याला मार्गदर्शन देते. आपण ते स्वीकारलं तर आपलं संरक्षण होऊ शकतं. त्यामुळे आपण आत्तापासूनच यहोवासोबत आपलं नातं मजबूत केलं पाहिजे आणि काही व्यावहारिक पावलं उचलली पाहिजेत.—लूक १६:१०.
-
यहोवासोबतचं नातं मजबूत करा: उपासनेशी संबंधित गोष्टी करण्याच्या चांगल्या सवयी लावा. प्रचारकार्याच्या वेगवेगळ्या पद्धती शिकून घ्या. मंडळीतल्या भाऊ-बहिणींना भेटता आलं नाही, तरी घाबरू नका. (यश ३०:१५) यहोवा आणि येशू नेहमी आपल्यासोबत आहेत, हे कधीही विसरू नका.—संगठित १७६ ¶१५-१७
-
व्यावहारिक पावलं उचला: आपातकालीन परिस्थितीसाठी गो-बॅग तयार ठेवा. आपल्या कुटुंबासाठी लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या वस्तू, पाणी, औषधं आणि इतर गरजेच्या वस्तू पुरेशा प्रमाणात आहेत का, याची खात्री करून घ्या. अचानक जर घर सोडावं लागलं तर या गोष्टींची मदत होऊ शकते.—नीत २२:३; सावध राहा!१७.५-HI ४, ६
नैसर्गिक विपत्तीसाठी तुम्ही तयार आहात का? हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
विपत्तीचा सामना करता यावा म्हणून आपण आत्ताच यहोवासोबतचं आपलं नातं कसं मजबूत करू शकतो?
-
आपण मंडळीतल्या वडिलांच्या संपर्कात का राहिलं पाहिजे?
-
आपण गरजेच्या वस्तूंची एक बॅग का तयार ठेवली पाहिजे?
-
आपल्या भागात कोणकोणत्या विपत्ती येऊ शकतात आणि त्या आल्यावर आपण काय केलं पाहिजे याबद्दल आपल्या कुटुंबासोबत चर्चा करणं का गरजेचं आहे?
-
कोणत्या तीन मार्गांनी आपण विपत्तीग्रस्त भागातल्या भाऊ-बहिणींची मदत करू शकतो?
स्वतःला विचारा, ‘कोरोना व्हायरस महामारीमुळे, विपत्तीचा सामना करण्यासाठी आधीपासूनच तयार राहण्याच्या बाबतीत मला काय शिकायला मिळालं?’