सेवाकार्यासाठी तयार व्हा | सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा
उत्साहाने शिकवा
जर आपण उत्साहाने शिकवलं तर ऐकणारेही उत्साहाने, लक्ष देऊन ऐकतील. आपण जो संदेश सांगत आहोत, तो किती महत्त्वाचा आहे ते त्यांना कळेल. आपली भाषा किंवा संस्कृती कोणतीही असली, तरी विद्यार्थ्यांना आपण उत्साहाने शिकवू शकतो. (रोम १२:११) आपण हे कसं करू शकतो?
सगळ्यात आधी, आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की आपण जी माहिती सांगत आहोत, ती किती महत्त्वाची आहे. आपण लोकांना “चांगल्या गोष्टींबद्दल आनंदाचा संदेश” सांगतो. (रोम १०:१५) दुसरी गोष्ट म्हणजे, ऐकणाऱ्या लोकांना या संदेशामुळे जो फायदा होणार आहे, त्याबद्दलही आपण विचार केला पाहिजे. त्यांनी हा संदेश ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. (रोम १०:१३, १४) आणखी एक गोष्ट म्हणजे, उत्साहाने शिकवताना तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव नाटकी नाही, तर स्वाभाविक वाटले पाहिजेत.
शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा—उत्साहाने शिकवून हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेले प्रश्न विचारा:
-
निताचा उत्साह का कमी झाला?
-
निताला सेवाकार्यातला आपला उत्साह परत कसा वाढवता आला?
-
आपण इतरांच्या चांगल्या गुणांकडे का जास्त लक्ष दिलं पाहिजे?
-
आपण जर उत्साहाने शिकवलं तर त्याचा आपल्या विद्यार्थ्यांवर आणि इतरांवर कसा परिणाम होईल?