ख्रिस्ती जीवन
आपल्या इच्छांना ताब्यात ठेवा
अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्याला कायम आपल्या इच्छांना ताब्यात ठेवण्यासाठी झगडावं लागतं. आपण जर या इच्छांना आपल्यावर ताबा मिळवू दिला, तर यहोवासोबतचं आपलं नातं धोक्यात येऊ शकतं. उदाहरणार्थ, काही जण देवापेक्षा खाणंपिणं, कपडालत्ता आणि घरदार यांसारख्या गोष्टींना जास्त महत्त्व देतात. तर काही जण आपल्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाच्या तत्त्वांच्या विरोधात वागतात. (रोम १:२६, २७) तसंच, लोकांनी आपल्याला त्यांच्यात सामील करून घ्यावं म्हणून काही जण चुकीच्या गोष्टी करण्याच्या त्यांच्या दबावाला बळी पडतात.—निर्ग २३:२.
मग आपण आपल्या इच्छांवर कशा प्रकारे नियंत्रण मिळून शकतो? यासाठी आपण आध्यात्मिक गोष्टींना जास्त महत्त्व दिलं पाहिजे. (मत्त ४:४) तसंच, आपल्या इच्छांवर नियंत्रण करता यावं म्हणून आपण यहोवाला कळकळून प्रार्थना केली पाहिजे. कारण आपल्यासाठी सगळ्यात चांगलं काय आहे आणि आपल्या योग्य इच्छा कशा पूर्ण करायच्या हे त्यालाच माहीत आहे.—स्तो १४५:१६.
सिगारेटच्या धुरात आयुष्य फुंकून टाकू नका हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा:
-
काही लोक सिगारेट का पितात?
-
सिगारेट ओढल्यामुळे कोणते वाईट परिणाम होऊ शकतात?
-
सिगारेट ओढणं किंवा वेपिंग (ई-सिगारेटचा वापर करणं) चुकीचं का आहे?—२कर ७:१
-
सिगारेट पिण्याच्या दबावाचा तुम्ही सामना कसा करू शकता? आणि सिगारेट पिण्याची सवय तुम्ही कशी मोडू शकता?