ख्रिस्ती जीवन
“प्रेम . . . सर्व गोष्टींची आशा धरतं”
आपल्या भाऊबहिणींवर आपलं निःस्वार्थ प्रेम असल्यामुळे त्यांचं नेहमी भलं व्हावं अशी आशा आपण बाळगतो. (१कर १३:४, ७) उदाहरणार्थ, एखाद्या भावाच्या हातून गंभीर पाप झालं आहे आणि त्याला ताडन देण्यात आलं आहे. तर अशा वेळी, आपण हीच आशा बाळगतो की त्याला सुधारण्यासाठी जे काही प्रयत्न केले जात आहेत त्यांना तो चांगला प्रतिसाद देईल. तसंच, ज्यांचा विश्वास कमजोर असतो, त्यांच्याशी आपण सहनशीलतेने वागतो आणि त्यांना मदत करायचा प्रयत्न करतो. (रोम १५:१) एखादा भाऊ सत्य सोडून गेला असेल, तर कधी ना कधी तो परत येईल ही आशा आपण सोडत नाही.—लूक १५:१७, १८.
प्रेम कसं वागतं हे लक्षात ठेवा—ते सर्व गोष्टींची आशा धरतं हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा:
-
अबनेर एकनिष्ठ नव्हता असं का म्हणता येईल?
-
अबनेरच्या विनंतीबद्दल दावीदची आणि यवाबची प्रतिक्रिया कशी वेगळी होती?
-
आपण आपल्या भाऊबहिणींबद्दल नेहमी चांगलाच विचार का केला पाहिजे?