व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

संकटाच्या परिस्थितीचा सामना करायला तुम्ही तयार आहात का?

संकटाच्या परिस्थितीचा सामना करायला तुम्ही तयार आहात का?

आपल्याला माहीत आहे की जगाचा अंत जसजसा जवळ येत जाईल तसतशी सामाजिक अशांतता, दहशतवाद आणि युद्धांचं प्रमाण वाढत जाईल. (प्रक ६:४) मग भविष्यात येणाऱ्‍या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण आत्ताच तयारी कशी करू शकतो?

  • यहोवासोबतचं तुमचं नातं मजबूत करा: बायबलमधून अशी तत्त्वं आणि अहवाल शोधा, जे यहोवा आणि त्याच्या संघटनेवरचा तुमचा भरवसा आणखी मजबूत करतील आणि निष्पक्ष राहायला तुम्हाला मदत करतील. (नीत १२:५; टेहळणी बुरूज१३ ९/१५ १४ ¶११) तसंच मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत आपण आत्ताच आपलं नातं मजबूत केलं पाहिजे. —१पेत्र ४:७, ८

  • इतर व्यावहारिक गोष्टींची तयारी करा: घरातून बाहेर पडणं शक्य झालं नाही तर काय करता येईल याचा विचार करून गरजेच्या वस्तूंचा आवश्‍यकतेनुसार साठा करून ठेवा. घर सोडून जावं लागलं तर काय करता येईल याची आधीच योजना करून ठेवा. गो बॅगमध्ये ठेवलेल्या वस्तू तपासून पाहा. तसंच, स्वतःच्या सुरक्षिततेसाठी मास्क, सॅनिटायझर यांसारख्या वस्तू त्यात ठेवा. संकटाच्या वेळी वडिलांना तुमच्याशी आणि तुम्हाला त्यांच्याशी संपर्क करता यावा म्हणून आवश्‍यक माहिती जवळ ठेवा आणि वडिलांनाही द्या.—यश ३२:२; सजग होईए!१७.५ ३-७.

संकटाच्या वेळी, उपासनेशी संबंधित कार्यं करत राहा. (फिलि १:१०) तुम्ही राहत असलेलं ठिकाण सुरक्षित असेल तर शक्यतो तिथेच राहा. विनाकारण ठिकाण बदलू नका. (मत्त १०:१६) खाण्याच्या आणि इतर गरजेच्या वस्तू पुरवण्यासाठी एकमेकांना मदत करा.—रोम १२:१३.

तुम्ही विपत्तीसाठी तयार आहात का?  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • संकटाच्या काळात यहोवा आपल्याला कशी मदत करतो?

  • विपत्तीचा सामना करण्यासाठी आपण आत्तापासूनच कोणती व्यावहारिक पावलं उचलू शकतो?

  • संकटाच्या काळात आपण एकमेकांना कशी मदत करू शकतो?