ख्रिस्ती जीवन
“प्रेम . . . गर्वाने फुगत नाही”
प्रेमामुळे आपल्याला नम्र राहायला मदत होते. (१कर १३:४) आपलं आपल्या भाऊबहिणींवर प्रेम असेल तर आपण स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणार नाही. शिवाय, इतरांमध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊ आणि त्यांना मदत करण्यासाठी आपण आपल्या क्षमता आणि कौशल्यांचा वापर करू. (फिलि २:३, ४) आपण जितकं जास्त इतरांना प्रेम दाखवत राहू, तितकं जास्त यहोवा त्याच्या सेवेसाठी आपला उपयोग करत राहील.
प्रेम कसं वागतं हे लक्षात ठेवा—गर्वाने फुगत नाही हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा:
-
अबशालोमकडे कोणत्या चांगल्या गोष्टी होत्या?
-
त्याने त्याच्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींचा कसा दुरुपयोग केला?
-
आपण गर्विष्ठपणे वागायचं कसं टाळू शकतो?—गल ५:२६