व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

अलीकडच्या घटनांबद्दल बोलून राज्याचा संदेश सांगा

अलीकडच्या घटनांबद्दल बोलून राज्याचा संदेश सांगा

सेवाकार्यात बोलताना येशूने त्या काळात घडलेल्या घटनांचा उल्लेख करून लोकांना शिकवलं. (लूक १३:१-५) तुम्हीसुद्धा राज्याचा संदेश सांगताना लोकांची उत्सुकता वाढवण्यासाठी अलीकडे घडलेल्या घटनांचा उल्लेख करू शकता. वाढती महागाई, नैसर्गिक विपत्ती, सामाजिक अशांतता, ड्रग्जच्या व्यसनाचं वाढतं प्रमाण किंवा अशाच एखाद्या समस्येचा उल्लेख करून तुम्ही त्यांना विचार करायला लावणारा एक प्रश्‍न विचारू शकता. जसं की, “. . . ही समस्या कुठंतरी थांबेल असं तुम्हाला वाटतं का?” किंवा “. . . या समस्येवर काही तोडगा आहे असं तुम्हाला वाटतं का?” असे प्रश्‍न तुम्ही विचारू शकता. त्यानंतर या विषयाशी संबंधित असलेलं एखादं वचन दाखवा. कोणी आवड दाखवली तर शिकवण्याच्या साधनांमधला एखादा व्हिडिओ किंवा प्रकाशन दाखवा. आपण सांगत असलेला संदेश आपल्या क्षेत्रातल्या लोकांच्या मनाला भिडावा म्हणून आपण ‘आनंदाच्या संदेशासाठी सर्वकाही करण्याचा’ प्रयत्न करत राहू या.—१कर ९:२२, २३.

तुमच्या  क्षेत्रांतल्या लोकांना कोणत्या विषयांवर बोलायला आवडेल?