देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
यहोवाने दावीदसोबत करार केला
यहोवाने वचन दिलं होतं, की तो दावीदसाठी एक राजघराणं तयार करेल (२शमु ७:११, १२, तळटीप; टेहळणी बुरूज१० ४/१ २० ¶३; पहिल्या पानावरचं चित्र पाहा)
यहोवाने दावीदसोबत केलेल्या करारातल्या काही गोष्टी मसीहाच्या बाबतीत पूर्ण झाल्या (२शमु ७:१३, १४; इब्री १:५; टेहळणी बुरूज१० ४/१ २० ¶४)
मसीहाच्या राज्यामुळे होणारे फायदे कायमसाठी टिकून राहतील (२शमु ७:१५, १६; इब्री १:८; टेहळणी बुरूज१४ १०/१५ १० ¶१४)
सूर्य आणि चंद्र हे कायम टिकून राहतील. ते आपल्याला आठवण करून देतात, की मसीही राज्याचा कधीच अंत होणार नाही. (स्तो ८९:३५-३७) म्हणून जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे पाहता, तेव्हा यहोवा त्याच्या राज्याद्वारे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी काय-काय करणार आहे याचा विचार करा.