ख्रिस्ती जीवन
धर्मत्यागापासून स्वतःचं संरक्षण करा
आपला विश्वास कमजोर करण्यासाठी सैतान आणि त्याच्या प्रभावाखाली असलेले लोक खऱ्या गोष्टींमध्ये खोट्या गोष्टींची भेसळ करतात. (२कर ११:३) उदाहरणार्थ, यहोवाच्या लोकांचा धीर खचवण्यासाठी अश्शूरी लोकांनी अर्धवट खऱ्या असलेल्या आणि सरळसरळ खोट्या असलेल्या गोष्टींचा उपयोग केला. (२इत ३२:१०-१५) आज धर्मत्यागी लोक अशाच युक्त्या वापरतात. मग त्यांच्या शिकवणींकडे आपण कसं बघितलं पाहिजे? त्या आपल्यासाठी विष आहेत असं समजा! अशा गोष्टी कधीच वाचू नका, त्यांना उत्तर देऊ नका किंवा त्यांबद्दल इतरांना सांगू नका. जर यहोवा आणि त्याच्या संघटनेबद्दल मनात शंका निर्माण करणारी माहिती ऐकायला मिळाली, तर ती धर्मत्यागी लोकांकडून आहे हे लगेच ओळखा आणि त्यापासून दूर राहा!—यहू. ३, ४.
विश्वासाचं रक्षण करायचा आटोकाट प्रयत्न करा!—निवडक भाग, हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
इंटरनेट फोरम (इंटरनेटवर संवाद साधण्याचं माध्यम) वापरताना आपण सावधगिरी का बाळगली पाहिजे?
-
रोमकर १६:१७ मध्ये दिलेला सल्ला आपण कसा लागू करू शकतो?