ख्रिस्ती जीवन
तुम्ही ऑडिओ बायबलचा चांगला फायदा करून घेत आहात का?
ऑडिओ बायबल काय आहे? हे नवे जग भाषांतर याचं ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. ते हळूहळू वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध केलं जात आहे. या ऑडिओ बायबलचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे, शक्य असेल तेव्हा बायबलच्या वेगवेगळ्या पात्रांसाठी वेगवेगळा आवाज वापरण्यात आला आहे. यात योग्य शब्दांवर जोर देण्यात आलाय आणि योग्य भावना ओतून ते वाचण्यात आलंय. त्यामुळे ऐकणाऱ्याला बायबलचा संदेश अगदी अचूकपणे समजतो.
ऑडिओ बायबलमुळे काही लोकांना कसा फायदा झाला आहे? बऱ्याच जणांना ऑडिओ बायबल नियमितपणे ऐकायला आवडतं, कारण ऐकत असताना बायबलचा अहवाल डोळ्यांसमोर जिवंत होतो. बायबलच्या वेगवेगळ्या पात्रांचा आवाज ऐकताना त्यांतल्या घटनांची चांगल्या प्रकारे कल्पना करता येते आणि त्यामुळे बायबलचा अहवाल आणखी चांगल्या प्रकारे समजून घेता येतो. (नीत ४:५) बऱ्याच लोकांचा असा अनुभव आहे, की मनात चिंता असताना ऑडिओ बायबल ऐकल्यामुळे मन शांत ठेवायला त्यांना मदत होते.—स्तो ९४:१९.
आपण जेव्हा देवाचं वचन मोठ्याने वाचतो तेव्हा त्याचा आपल्यावर खूप खोलवर प्रभाव पडतो. (२इत ३४:१९-२१) जर तुमच्या भाषेमध्ये पूर्ण ऑडिओ बायबल किंवा त्याचा काही भाग उपलब्ध असेल, तर ते नियमितपणे ऐकण्याची सवय तुम्ही स्वतःला लावू शकता का?
ऑडिओ बायबलची निर्मिती—निवडक भाग, हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या:
ऑडिओ बायबल ज्या प्रकारे रेकॉर्ड करण्यात आलंय त्यात कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली?