व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

स्वतःला यहोवाच्या नजरेतून पाहा

स्वतःला यहोवाच्या नजरेतून पाहा

“यहोवाला आपले लोक प्रिय आहेत.” (स्तो १४९:४) आपण अपरिपूर्ण असलो, तरी यहोवा आपल्या चांगल्या गुणांकडे आणि आपण स्वतःमध्ये सुधारणा करून किती चांगली व्यक्‍ती बनू शकतो याकडे पाहतो. पण काही वेळा आपल्याला स्वतःबद्दल असा चांगला दृष्टिकोन बाळगायला कठीण जाऊ शकतं. इतर जण आपल्याशी ज्या प्रकारे वागतात त्यामुळे आपल्यामध्ये कदाचित कमीपणाची भावना असेल. किंवा मग, आपल्याकडून पूर्वी ज्या चुका झाल्या होत्या त्यांमुळे ‘यहोवा अजूनही खरंच माझ्यावर प्रेम करत असेल का,’ अशी शंका कदाचित आपल्या मनात असेल. असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपल्याला कशामुळे मदत मिळू शकते?

नेहमी लक्षात ठेवा, की माणूस जसं पाहतो तसं यहोवा पाहत नाही. (१शमु १६:७) म्हणजे आपल्याला स्वतःमध्ये ज्या चांगल्या गोष्टी दिसत नाहीत, त्या यहोवा पाहतो. आणि हे समजण्यासाठी आपल्याला बायबलमुळे खरंच खूप मदत होते! आपण जेव्हा बायबल वाचतो आणि त्यातल्या अहवालांवर विचार करतो तेव्हा यहोवा आपल्या सेवकांवर किती प्रेम करतो हे आपल्याला चांगल्या प्रकारे कळतं.

यहोवाच्या प्रेमाची स्वतःला खातरी पटवून द्या  हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • शर्यतीत धावणाऱ्‍या मुलाच्या आणि त्याच्या वडिलांच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

  • गंभीर पाप केलेली व्यक्‍ती जेव्हा खरा पश्‍चात्ताप करून यहोवासोबत पुन्हा नातं जोडण्यासाठी पावलं उचलते, तेव्हा यहोवाचं तिच्यावर अजूनही प्रेम आहे या गोष्टीची ती स्वतःला कशा प्रकारे खातरी पटवून देऊ शकते?—१यो ३:१९, २०

  • दावीद आणि यहोशाफाटच्या उदाहरणांवर मनन केल्यामुळे व्हिडिओमधल्या भावाला कशी मदत झाली?