ख्रिस्ती जीवन
लोकांसोबत संभाषण सुरू करून आनंद मिळवा
लोकांसोबत दररोजच्या विषयांवर सहज गप्पागोष्टी करणं हा साक्ष देण्याचा एक खूप चांगला मार्ग आहे. आणि त्यातून खूप आनंदही मिळतो. पण बायबलमधली एखादी माहिती कशी सांगता येईल यावर जर आपण खूप जास्त विचार करत बसलो, तर संभाषण सुरू करायच्या विचारानेच आपल्याला भीती वाटेल. त्यामुळे साक्ष देण्यासाठी काय बोलता येईल याबद्दल जास्त विचार करत बसण्यापेक्षा त्यांच्याशी बोलायला, त्यांचे विचार जाणून घ्यायला तुम्हाला आवडतं हे दाखवा. (मत्त २२:३९; फिलि २:४) आणि मग गप्पांच्या ओघात जर आपल्या विश्वासाबद्दल काहीतरी सांगायची संधी मिळाली तर त्या संधीचा फायदा घ्या. आणि त्यासाठी आपल्याकडे बरीच साधनं उपलब्ध आहेत.
गप्पागोष्टी करताना जर साक्ष द्यायची संधी मिळाली तर तुम्ही पुढे दिलेल्या साधनांचा कशा प्रकारे वापर करू शकता?
दुसऱ्यांकडून शिका कुशल बना—संभाषणाची सुरुवात, हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या:
संभाषणाची कौशल्यं वाढवण्यासाठी तुम्ही कोणती तीन पावलं उचलू शकता?