ख्रिस्ती जीवन
यहोवा “अनाथांचा पिता” आहे
दर वर्षी कित्येक तरुण लोक यहोवाशी मैत्री करायचा निर्णय घेतात. (स्तो ११०:३) त्यांपैकी तुम्ही एक असाल, तर याची खातरी बाळगा की यहोवाला तुमची काळजी आहे. तुम्हाला व्यक्तिगतपणे कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हे त्याला चांगलं माहीत आहे. आणि त्या समस्यांवर मात करून त्याची सेवा करत राहायला मदत करायचं वचन तो तुम्हाला देतो. तुम्हाला जर तुमच्या आईने किंवा वडिलांनी एकट्यानेच सत्यात वाढवलं असेल, तर यहोवा “अनाथांचा पिता” आहे हे नेहमी लक्षात ठेवा. (स्तो ६८:५) घरातली परिस्थिती कशीही असली, तरी यहोवाकडून मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळे तुम्ही त्याची सेवा करू शकता.—१पेत्र ५:१०.
विश्वासाची लढाई जिंकणारे—ज्यांना फक्त आईने किंवा वडिलाने सत्यात वाढवलं हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
टामी, चार्ल्स आणि जिमी यांच्या उदाहरणांतून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
-
ज्या मुलांना फक्त त्यांच्या आईने किंवा वडिलांनी एकट्याने वाढवलंय त्यांना स्तोत्र २७:१० मधून कोणत्या गोष्टीची खातरी मिळते?