व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

आर्थिक मंदीला तोंड देण्यासाठी तुम्ही तयार आहात का?

आर्थिक मंदीला तोंड देण्यासाठी तुम्ही तयार आहात का?

जगात जेव्हा अशा काही घटना घडतात ज्यांमुळे जगभरातली आर्थिक व्यवस्था हादरून जाते तेव्हा आपल्याला आश्‍चर्य वाटत नाही. का बरं? कारण सध्या आपण शेवटच्या दिवसांच्या अगदी शेवटच्या टप्प्यात जगत आहोत. आणि बायबल आपल्याला सांगतं, की आपण “नाश होणाऱ्‍या धनावर” भरवसा ठेवू नये. (१ती ६:१७; २ती ३:१) असं असलं, तरी आपल्याला आर्थिक मंदीचा सामना करावा लागतो. मग आर्थिक मंदीचा सामना करायला तयार राहण्यासाठी यहोशाफाट राजाचं उदाहरण आपल्याला कसं मदत करू शकतं?

जेव्हा आजूबाजूची शत्रू राष्ट्रं यहोशाफाटवर हल्ला करणार होती तेव्हा त्याने यहोवावर भरवसा ठेवला. (२इत २०:९-१२) यासोबतच त्याने काही व्यावहारिक पावलंही उचलली. त्याने मजबूत किल्ले आणि कोठारांची शहरं बांधली आणि ठिकठिकाणी सैनिकांच्या चौक्या उभारल्या. (२इत १७:१, २, १२, १३) यहोशाफाटप्रमाणे आपणसुद्धा कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी यहोवावर भरवसा ठेवला पाहिजे आणि काही व्यावहारिक पावलं उचलली पाहिजेत.

तुम्ही विपत्तीसाठी तयार आहात का?  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • कोणत्याही विपत्तीसाठी आधीच तयार राहायला तुम्ही काय करू शकता?

  • इतरांना मदत करण्यासाठी आपण आधीच तयार कसं राहू शकतो?