देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“तुमच्या देवावर, यहोवावर भरवसा ठेवा”
यहोशाफाट आणि त्याच्या लोकांवर शत्रू हल्ला करणार होते तेव्हा त्यांनी यहोवाकडे मदत मागितली (२इत २०:१२, १३; टेहळणी बुरूज१४ १२/१५ २३ ¶८)
यहोवाने आपल्या लोकांना धीर दिला आणि त्यांना अगदी स्पष्ट मार्गदर्शन दिलं (२इत २०:१७)
यहोवाच्या लोकांनी त्याच्यावर भरवसा ठेवला म्हणून यहोवाने त्यांचं संरक्षण केलं (२इत २०:२१, २२, २७; टेहळणी बुरूज२१.११ १६ ¶७)
मोठ्या संकटाच्या वेळी मागोगचा गोग यहोवाच्या लोकांवर हल्ला करेल, तेव्हा यहोवावर विश्वास ठेवणाऱ्यांना आणि त्याने नेतृत्व करण्यासाठी ज्यांना नेमलंय त्यांच्यावर भरवसा ठेवणाऱ्यांना घाबरण्याचं काहीच कारण नसेल.—२इत २०:२०.