व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१७-२३ जून

स्तोत्रं ५१-५३

१७-२३ जून

गीत ८९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. गंभीर पापापासून दूर राहण्यासाठी पावलं उचला

(१० मि.)

आपल्याकडून कोणतंच पाप होणार नाही असा विचार करू नका, कारण आपल्या सगळ्यांचाच कल वाईट गोष्टी करण्याकडे असतो (स्तो ५१:५; २कर ११:३)

यहोवासोबतचं तुमचं नातं मजबूत होईल अशा गोष्टी करत राहा (स्तो ५१:६; टेहळणी बुरूज१९.०१ १५ ¶४-५)

अनैतिक विचार आणि इच्छांविरुद्ध लढत राहा (स्तो ५१:१०-१२; टेहळणी बुरूज१५ ६/१५ १४ ¶५-६)

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ५२:२-४—या वचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे दवेगने काय केलं? (इन्साइट-१ ६४४)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(२ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. (शिष्य बनवा  धडा ७ मुद्दा ३)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(२ मि.) घरोघरचं साक्षकार्य. (शिष्य बनवा  धडा ४ मुद्दा ४)

६. पुन्हा भेटण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. देवाचं नाव काय आहे ते सांगा. (शिष्य बनवा  धडा ९ मुद्दा ५)

७. शिष्य बनवण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

गीत ११५

८. चुका सुधारण्यासाठी पावलं उचला

(१५ मि.) चर्चा.

आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण चुकतोच. (१यो १:८) आपल्या हातून चूक होते तेव्हा आपल्याला कदाचित लोक काय म्हणतील याची चिंता वाटेल किंवा आपल्याला शिक्षा होईल अशी भीती वाटेल. पण, या गोष्टीमुळे आपण यहोवाला क्षमा मागण्यासाठी आणि त्याची मदत घेण्यासाठी मागेपुढे पाहिलं नाही पाहिजे. (१यो १:९) चूक सुधारायचं पहिलं पाऊल म्हणजे यहोवाकडे वळणं.

स्तोत्र ५१:१, २, १७ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:

  •   आपल्या हातून गंभीर चूक होते, तेव्हा यहोवाकडे मदत मागण्यासाठी दावीदचे शब्द आपल्याला कसं प्रोत्साहन देतात?

माझे किशोरवयातले दिवस—चुका होतात तेव्हा काय करावं?  हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  •   कोणत्या गोष्टींमुळे तलिला आणि जोसे यांनी चुका केल्या?

  •   त्यांच्या चुका सुधारण्यासाठी त्यांनी कोणती पावलं उचलली?

  •   असं केल्यामुळे त्यांना कोणते फायदे झाले?

९. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १२९ आणि प्रार्थना