व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२०-२६ मे

गीत १०२ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. आपण इतरांना मदत का केली पाहिजे?

(१० मि.)

इतरांना मदत केल्यामुळे आपल्याला आनंद होतो (स्तो ४१:१; टेहळणी बुरूज१८.०८ २२ ¶१६-१८)

जे इतरांना मदत करतात त्यांना यहोवा मदत करतो (स्तो ४१:२-४; टेहळणी बुरूज१५ १२/१५ २४ ¶७)

आपण इतरांना मदत करतो तेव्हा यहोवाची स्तुती करत असतो (स्तो ४१:१३; नीत १४:३१; टेहळणी बुरूज१७.०९ १२ ¶१७)

स्वतःला विचारा, ‘माझ्या मंडळीत कोणाला JW लायब्ररी  ॲप कसं वापरायचं ते शिकून घ्यायला मदत हवी आहे का?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ४०:५-१०—यहोवालाच संपूर्ण पृथ्वीवर राज्य करायचा अधिकार आहे ही गोष्ट समजून घेण्याबद्दल दावीदची प्रार्थना आपल्याला काय शिकवते? (इन्साइट-२ १६)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. खूश दिसणाऱ्‍या व्यक्‍तीसोबत संभाषण सुरू करा. (शिष्य बनवा  धडा २ मुद्दा ३)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. दुःखी दिसणाऱ्‍या व्यक्‍तीसोबत संभाषण सुरू करा. (शिष्य बनवा  धडा ३ मुद्दा ५)

६. शिष्य बनवण्यासाठी

(५ मि.) कायम आनंद घ्या!  धडा १४ मुद्दा ६. सभांमध्ये उत्तरं द्यायला कचरत असलेल्या विद्यार्थ्यासोबत “हेसुद्धा पाहा” भागातल्या “मंडळीमध्ये यहोवाची स्तुती करा” या लेखामधल्या एखाद्या मुद्द्‌यावर चर्चा करा. (शिकवणे  अभ्यास १९)

ख्रिस्ती जीवन

गीत १३८

७. वयस्कर भाऊबहिणींचं भलं करा

(१५ मि.) चर्चा.

मंडळीतले वयस्कर भाऊबहीण मंडळीसाठी जे करत आहेत त्याची यहोवाला आणि आपल्यालाही खूप कदर वाटते. (इब्री ६:१०) बऱ्‍याच वर्षांपासून त्यांनी इतर भाऊबहिणींना शिकवण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी खूप काही केलंय. त्यांनी तुम्हालाही वेगवेगळ्या मार्गांनी कशी मदत केली आहे ते नक्कीच तुम्हाला आठवत असेल. त्यांनी मंडळीसाठी जे केलंय आणि जे करत आहेत त्यासाठी तुम्ही कदर कशी दाखवू शकता?

आपल्या भाऊबहिणींचं भलं करा  हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  •   ब्रदर हू-जीनकडून जी-हूनला काय शिकायला मिळालं?

  •   तुमच्या मंडळीतल्या वयस्कर भाऊबहिणींबद्दल तुम्हाला कोणती गोष्टी आवडते?

  •   चांगल्या शोमरोनी माणसाच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

  •   ब्रदर हू-जीनला मदत करताना जी-हूनने इतर भाऊबहिणींनाही सामील केलं. हा एक चांगला निर्णय होता असं तुम्हाला का वाटतं?

जेव्हा आपण आपल्या मंडळीतल्या वयस्कर भाऊबहिणींच्या गरजांचा बारकाईने विचार करतो तेव्हा आपल्याला त्यांना मदत करायच्या बऱ्‍याच संधी मिळतील. जेव्हा तुम्हाला त्यांची गरज लक्षात येते तेव्हा त्यांना मदत कशी करता येईल याचा विचार करा.—याक २:१५, १६.

गलतीकर ६:१० वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:

  •   तुम्ही कोणत्या मार्गांनी तुमच्या मंडळीतल्या वयस्कर “भाऊबहिणींचं भलं” करू शकता?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ८ आणि प्रार्थना