व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२७ मे–२ जून

स्तोत्रं ४२-४४

२७ मे–२ जून

गीत ८८ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. यहोवाकडून मिळणाऱ्‍या शिक्षणाचा फायदा करून घ्या

(१० मि.)

इतरांसोबत मिळून यहोवाची उपासना करा; शक्य असेल तर प्रत्यक्ष उपस्थित राहा (स्तो ४२:४, ५; टेहळणी बुरूज०६ ६/१ ७ ¶३)

बायबलचा अभ्यास करण्याआधी प्रार्थना करा (स्तो ४२:८; टेहळणी बुरूज१२ १/१५ १५ ¶२)

जीवनात प्रत्येक गोष्ट करताना बायबलच्या मार्गदर्शनाचं पालन करा (स्तो ४३:३)

यहोवाकडून मिळणाऱ्‍या शिक्षणामुळे आपल्याला परीक्षांचा सामना करायला आणि समर्पणाचं वचन पाळायला मदत होते.—१पेत्र ५:१०; टेहळणी बुरूज१६.०९ ५ ¶११-१२.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ४४:१९—‘कोल्हे राहतात ते ठिकाण’ कदाचित कशाला सूचित करत असावं? (इन्साइट-१ १२४२)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. बायबल अभ्यास करायला आवडेल का हे विचारा. (शिष्य बनवा  धडा ५ मुद्दा ५)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(५ मि.) घरोघरचं साक्षकार्य. पुढच्या जाहीर भाषणाचं आमंत्रण द्या. यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात?  या व्हिडिओबद्दल सांगा. (शिष्य बनवा  धडा ७ मुद्दा ५)

६. भाषण

(३ मि.) शिष्य बनवा  आणखी माहिती क मुद्दा ४—विषय: आपण कधीच आजारी पडणार नाही. (शिकवणे  अभ्यास २)

ख्रिस्ती जीवन

गीत २१

७. शिक्षणाच्या आणि कामाच्या बाबतीत योग्य निर्णय घ्या

(१५ मि.) चर्चा.

तरुणांनो, शाळेचं शिक्षण पूर्ण झाल्यावर काय करायचं याचा तुम्ही विचार करत आहात का? पायनियर सेवा करता यावी म्हणून कोणती नोकरी करायची हे तुम्ही कदाचित आधीच ठरवलं असेल. किंवा तुम्ही नोकरीसोबत पायनियर सेवा करण्यासाठी कदाचित असा एखादा कोर्स करायचा विचार करत असाल, ज्यामुळे तुम्हाला एखादं कौशल्य शिकून घेता येईल, एखाद्या कामाचं लायसन्स मिळवता येईल किंवा एखादा डिप्लोमा मिळवता येईल. हा तुमच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे! शिक्षणाचे बरेच पर्याय उपलब्ध असल्यामुळे कोणता कोर्स निवडायचा याबाबतीत कदाचित तुमचा गोंधळ होत असेल. किंवा इतर जण खूश होतील असा निर्णय घ्यायचा तुमच्यावर दबाव येत असेल. पण योग्य निर्णय घ्यायला तुम्हाला कशामुळे मदत होईल?

मत्तय ६:३२, ३३ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:

  •   शिक्षणाच्या आणि कामाच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी तुम्हाला तुमची आध्यात्मिक ध्येयं चांगल्या प्रकारे का माहीत असली पाहिजेत?

  •   आईवडील आपल्या मुलांना मत्तय ६:३२, ३३ लागू करायला कशी मदत करू शकतात?—स्तो ७८:४-७

जास्त पैसा कमवण्याच्या किंवा नावलौकिक मिळवण्याच्या इच्छेने प्रभावित होऊन निर्णय घेऊ नका. (१यो २:१५, १७) लक्षात असू द्या की भरपूर धनसंपत्ती असलेल्या व्यक्‍तीला राज्याचा संदेश स्वीकारणं कठीण जाऊ शकतं. (लूक १८:२४-२७) आपण एकाच वेळी पैसा कमवण्याच्या मागे लागून  देवासोबतचं आपलं नातं मजबूत करू शकत नाही.—मत्त ६:२४; मार्क ८:३६.

व्यर्थ ठरणाऱ्‍या गोष्टींवर भरवसा ठेवण्यापासून सांभाळून राहा!—पैसा  हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  •   नीतिवचनं २३:४, ५ मुळे तुम्हाला चांगले निर्णय घ्यायला कशी मदत होऊ शकते?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ४१ आणि प्रार्थना