व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

३-९ जून

गीत २५ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

येशू ख्रिस्त आणि त्याची वधू म्हणजे १,४४,००० अभिषिक्‍त जन

१. एका राजाच्या लग्नाचं गीत

(१० मि.)

स्तोत्र ४५ मध्ये मसीहाच्या लग्नाबद्दल सांगितलंय (स्तो ४५:१, १३, १४; टेहळणी बुरूज१४ २/१५ ९-१० ¶८-९)

हर्मगिदोनच्या युद्धानंतर या राजाचं लग्न होईल (स्तो ४५:३, ४; टेहळणी बुरूज२२.०५ १७ ¶१०-१२)

या लग्नामुळे सर्व मानवांना आशीर्वाद मिळतील (स्तो ४६:८-११; इन्साइट-२ ११६९)


स्वतःला विचारा, ‘आपला राजाबद्दल, येशू ख्रिस्ताबद्दल आनंदाचा संदेश सांगण्यासाठी मी उत्सुक आणि आनंदी असतो का?’—स्तो ४५:१.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ४५:१६—हे वचन आपल्याला नंदनवनाबद्दल काय शिकवतं? (टेहळणी बुरूज१७.०४ ११ ¶९)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. (शिष्य बनवा  धडा १ मुद्दा ३)

५. भाषण

(५ मि.) टेहळणी बुरूज१४ २/१५ ३-४ ¶३-६—विषय: स्तोत्र ४५:१, २ या वचनांचा आपल्यासाठी काय अर्थ होतो? (शिकवणे  अभ्यास १८)

६. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(४ मि.) प्रात्यक्षिक. सावध राहा!१६.०३ ७-९—विषय: समलैंगिकतेबद्दल तुमचा दृष्टिकोन काय आहे? (शिष्य बनवा  धडा ६ मुद्दा ५)

ख्रिस्ती जीवन

गीत १३१

७. तुमच्या जोडीदारावर प्रेम करत राहा

(१० मि.) चर्चा.

लग्न सोहळा हा एक आनंदाचा प्रसंग असतो. (स्तो ४५:१३-१५) लग्नाचा दिवस हा एका जोडप्याच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असतो. पण हा आनंद आयुष्यभर असाच टिकवून ठेवण्यासाठी एक विवाहित जोडपं काय करू शकतं?—उप ९:९.

आनंदी विवाहासाठी एकमेकांवर प्रेम करत राहणं खूप महत्त्वाचं आहे. याबाबतीत पती-पत्नी, इसहाक आणि रिबकाचं अनुकरण करू शकतात. बायबल सांगतं की त्यांच्या लग्नाला ३० वर्षं उलटून गेली होती तरी त्यांच्यातलं प्रेम तसंच टिकून होतं. (उत्प २६:८) पती-पत्नी एकमेकांवर अशाच प्रकारे प्रेम कसं दाखवू शकतात?

आनंदी विवाहासाठी: प्रेम दाखवा  हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  •   कोणत्या गोष्टींमुळे पती-पत्नीमध्ये दुरावा येऊ शकतो?

  •   तुमच्या जोडीदाराला तुमच्या प्रेमाची आणि काळजीची जाणीव व्हावी म्हणून तुम्ही काय करू शकता?—प्रेका २०:३५

८. मंडळीच्या गरजा

(५ मि.)

९. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १११ आणि प्रार्थना