व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

६-१२ मे

गीत ८७ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. “दुष्ट माणसांमुळे संतापू नकोस”

(१० मि.)

दुष्ट लोकांमुळे आपल्याला दुःख आणि त्रास सहन करावा लागतो (स्तो ३६:१-४; टेहळणी बुरूज१७.०४ १० ¶४)

‘दुष्ट माणसांबद्दल’ मनात राग धरून ठेवल्यामुळे आपलंही नुकसान होतं (स्तो ३७:१, ७, ८; टेहळणी बुरूज२२.०६ १० ¶१०)

यहोवाच्या अभिवचनांवर भरवसा ठेवल्यामुळे आपल्याला शांती मिळते (स्तो ३७:१०, ११; टेहळणी बुरूज०३ १२/१ १४ ¶२०)

स्वतःला विचारा, ‘बातम्यांमध्ये दाखवल्या जाणाऱ्‍या हिंसेकडे मी जास्त लक्ष देतो का?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ३६:६—“तुझं नीतिमत्त्व भव्य पर्वतांसारखं [किंवा “देवाच्या पर्वतांसारखं,” तळटीप] आहे” असं स्तोत्रकर्त्याने जे म्हटलं, त्यावरून त्याला काय म्हणायचं असेल? (इन्साइट-२ ४४५)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. (शिष्य बनवा  धडा १ मुद्दा ५)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. बायबल अभ्यासासाठी पूर्वी नकार दिलेल्या एका व्यक्‍तीला पुन्हा बायबल अभ्यास करायची इच्छा आहे का ते विचारा. (शिष्य बनवा  धडा ९ मुद्दा ४)

६. भाषण

(५ मि.) टेहळणी बुरूज१४ ९/१५ २२—विषय: स्तोत्र ३७:२५ मधून असं सूचित होतं का, की यहोवा त्याच्या उपासकांना कधीच उपाशी राहू देणार नाही? (शिकवणे  अभ्यास १३)

ख्रिस्ती जीवन

गीत ३३

७. ‘संकटाच्या वेळेसाठी’ तुम्ही तयार आहात का?

(१५ मि.) चर्चा.

जगभरातल्या भाऊबहिणींना नैसर्गिक आणि माणसांमुळे येणाऱ्‍या विपत्तींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांचं खूप नुकसान होतं. (स्तो ९:९, १०) दुःखाची गोष्ट म्हणजे, ‘संकटाची वेळ’ कधीही येऊ शकते. त्यामुळे आपण नेहमी तयार असलं पाहिजे.

विपत्तीचा सामना करण्यासाठी आपण काही व्यावहारिक गोष्टी a करतो. पण, आणखी काय केल्यामुळे आपल्याला मदत होईल?

  • तुमचं मन तयार करा: विपत्ती कुठेही येऊ शकते हे लक्षात ठेवा. आणि ती आली तर तुम्ही काय कराल याचाही विचार करा. तुमच्याजवळ असलेल्या गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका. यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेता येतील आणि तुमच्याजवळ असलेल्या गोष्टींपेक्षा स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवण्याकडे लक्ष देता येईल. (उत्प १९:१६; स्तो ३६:९) तसंच तुम्ही जर तुमच्या वस्तूंमध्ये जास्त गुंतलेले नसाल, तर विपत्ती येऊन गेल्यावर तुम्हाला त्या गमावल्याचा जास्त त्रास होणार नाही.—स्तो ३७:१९

  • यहोवासोबतचं नातं मजबूत करा: यहोवाला तुमची काळजी घ्यायची इच्छा आणि ताकदही आहे या गोष्टीवरचा तुमचा भरवसा वाढवा. (स्तो ३७:१८) विपत्ती येण्याआधी स्वतःला नेहमी याची आठवण करून द्या, की आपल्या जीवावाचून आपल्याकडे काहीच उरलं नाही, तरी यहोवा नेहमी आपलं मार्गदर्शन करत राहील आणि आपली काळजी घेत राहील.—यिर्म ४५:५; स्तो ३७:२३, २४

यहोवा त्याची अभिवचनं नक्की पूर्ण करेल असा आपण भरवसा ठेवतो, तेव्हा आपण ‘संकटाच्या काळात त्याला आपला दुर्ग’ बनवत असतो.—स्तो ३७:३९.

तुम्ही विपत्तीसाठी तयार आहात का?  हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  •   विपत्तीच्या काळात यहोवा आपल्याला कशी मदत करतो?

  •   विपत्तीसाठी तयारी करायला आपण कोणती व्यावहारिक पावलं उचलू शकतो?

  •   विपत्तीमुळे ज्यांचं नुकसान झालंय त्यांना आपण मदत कशी करू शकतो?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ५७ आणि प्रार्थना