नमुना सादरीकरणं
भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता? (T-31 पान १)
प्रश्न: हा प्रश्न कधी तुमच्या मनात आला होता का? [पत्रिकेच्या पहिल्या पानावरील प्रश्न दाखवा.] आपल्या निर्माणकर्त्यानं काय अभिवचन दिलं आहे ते मी तुम्हाला दाखवलं तर चालेल का? [घरमालकानं होकार दिला तरच त्याला वचन दाखवा.]
वचन: प्रक २१:३, ४
सादरता: देव या जगाचा कायापालट कसा करणार आहे ते या पत्रिकेत सांगितलं आहे.
भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता? (T-31 पान २)
प्रश्न: पवित्र लिखाणांतील हे शब्द पूर्ण होतील, असं तुम्हाला वाटतं का? [घरमालकाला ऐकण्यात आवड असेल तरच त्याला वचन दाखवा.]
वचन: प्रक २१:३, ४
सादरता: हे नक्की खरं होईल यावर आपण विश्वास का ठेवू शकतो, ते या पत्रिकेत सांगितलं आहे.
देवाकडून आनंदाची बातमी!
प्रश्न: आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. तुम्हाला काय वाटतं, अशा वेळेला देवाला प्रार्थना केल्यानं काही फायदा होतो का? [घरमालकाला ऐकण्यात आवड असेल तरच त्याला वचन दाखवा.]
वचन: फिलि ४:६, ७
सादरता: [पृ. २४ परि. २ दाखवा.] देवाला आपल्या समस्यांबद्दल प्रार्थना केल्यानं कोणता फायदा होतो ते या माहितीपत्रिकेत सांगितलं आहे.
स्वतःचं सादरीकरण तयार करा
वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.