यहोवाच्या तंबूमध्ये कोण वस्ती करेल?
एखादा यहोवाच्या तंबूमध्ये वस्ती करतो तर याचा अर्थ तो देवाचा मित्र आहे. तो देवावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या आज्ञांचं पालन करतो. यहोवाचे मित्र बनण्यासाठी आपल्यामध्ये कोणते गुण असायला हवे ते स्तोत्र १५ मध्ये सांगितलं आहे.
यहोवाचे मित्र बनण्यासाठी . . .
-
एकनिष्ठा हवी
-
मनापासून सत्य बोलायला हवं
-
यहोवाच्या सहउपासकांचा आदर करायला हवा
-
कितीही कठीण असलं तरी, दिलेला शब्द पाळायला हवा
-
परतफेडीची अपेक्षा न करता, गरज असलेल्यांची मदत करायला हवी
यहोवाचे मित्र या गोष्टी टाळतात . . .
-
चुगली किंवा निंदा करणं
-
शेजाऱ्याचं वाईट करणं
-
आपल्या ख्रिस्ती बांधवांचा गैरफायदा घेणं
-
यहोवाची सेवा न करणाऱ्यांशी आणि त्याची आज्ञा न पाळणाऱ्यांशी संगती करणं
-
लाच घेणं