व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

आपण JW लायब्ररी कोणकोणत्या गोष्टींसाठी वापरू शकतो

आपण JW लायब्ररी कोणकोणत्या गोष्टींसाठी वापरू शकतो

अभ्यासासाठी:

  • बायबल वाचनासाठी आणि शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करण्यासाठी

  • इयरबुक, माहितीपत्रकं आणि इतर साहित्य वाचण्यासाठी. बुकमार्क फिचर वापरा

  • सभांची तयारी करण्यासाठी, आणि उत्तरं हायलाईट करण्यासाठी

  • व्हिडिओ बघण्यासाठी

सभांमध्ये:

  • वक्त्याने सांगितलेली वचनं बघण्यासाठी. एकदा काढलेलं वचन परत पाहण्यासाठी हिस्टरी फिचर पाहा

  • सभेमध्ये वेगवेगळी प्रकाशनं आणण्याऐवजी आपल्याकडील फोन किंवा टॅबमध्ये सभेदरम्यान होणाऱ्या भागांची माहिती बघण्यासाठी आणि त्यातूनच गाणीदेखील पाहण्यासाठी. JW लायब्ररी मध्ये अजून छापली गेली नाहीत अशी नवीन गाणीदेखील आहेत

प्रचारकार्यात:

  • आवडत दाखवणाऱ्या व्यक्तींना JW लायब्ररी मधून प्रकाशनं दाखवण्यासाठी, आणि त्यांना अॅप आणि प्रकाशनं त्यांच्या फोन किंवा टॅबवर डाऊनलोड करायला मदत करण्यासाठी

  • एखादं बायबल वचन शोधण्यास सर्च फिचरचा वापर करण्यासाठी. तुम्हाला हवा असलेला वचनातील भाग, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन मध्ये मिळत नसेल तर रेफरेन्स बायबल मध्ये शोधा

  • व्हिडिओ दाखवण्यासाठी. जर घरात मुलं असतील, तर तुम्ही यहोवाचे मित्र बना या श्रृंखलेतील एखादा व्हिडिओ दाखवू शकता. किंवा बायबलचा अभ्यास का करावा? हा व्हिडिओ दाखवून घरमालकाची बायबल अभ्यास करण्यासाठीची आवड वाढवू शकता. जर घरमालक दुसरी भाषा बोलत असेल तर त्या भाषेत व्हिडिओ दाखवा

  • आधीच डाऊनलोड करून ठेवलेल्या दुसऱ्या भाषेतील बायबलमधून घरमालकाला वचन दाखवण्यासाठी. वचन काढा, वचन क्रमांवर टॅप करा, पॅरेलल रेंडरींग आयकनवर टॅप करा आणि त्याच्या भाषेतील वचन दाखवा