२-८ मे
ईयोब ३८-४२
गीत १८ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“दुसऱ्यांसाठी प्रार्थना केल्याने यहोवाला आनंद होतो”: (१० मि.)
ईयो ४२:७, ८—ईयोबाने अलीफज, बिल्दद आणि सोफर यांच्यासाठी प्रार्थना करावी अशी यहोवाची अपेक्षा होती (टेहळणी बुरूज१३ ६/१५ पृ. २१, परि. १७; टे.बु.९८ ५/१ पृ. ३०, परि. ३-६)
ईयो ४२:१०—ईयोबाने त्यांच्यासाठी प्रार्थना केल्यानंतर यहोवाने त्याला चांगलं आरोग्य दिलं (टेहळणी बुरूज९८ ५/१ पृ. ३१, परि. ३)
ईयो ४२:१०-१७—यहोवाने ईयोबाला त्याचा विश्वास आणि धीर यासाठी अनेक आशीर्वाद दिले (टेहळणी बुरूज९४ ११/१५ पृ. २०, परि. १९-२०)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
ईयो ३८:४-७—“प्रभात-नक्षत्रं” कोण आहेत, आणि आपल्याला त्यांच्याबद्दल काय माहीत आहे? (बायबल काय शिकवते पृ. ९७, परि. ३)
ईयो ४२:३-५—ईयोबसारखं आपण देवाला पाहण्यासाठी काय करू शकतो? (टेहळणी बुरूज१५ १०/१५ पृ. ७-८, परि. १६-१७)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) ईयो ४१:१-२६
सेवाकार्यासाठी तयार व्हा
या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा, आणि मुख्य मुद्द्यांवर चर्चा करा. मोबाईलच्या किंवा टॅबच्या वापराबद्दल चर्चा करताना, “आपण JW लायब्ररी कोणकोणत्या गोष्टींसाठी वापरू शकतो” या लेखाचा थोडक्यात संदर्भ द्या. महिन्यात त्यांनी जितक्या वेळा प्रचारात व्हिडिओ दाखवले त्याचा रिपोर्ट देण्याची श्रोत्यांना आठवण करून द्या. प्रचारकांना स्वतःचं सादरीकरण तयार करण्याचं उत्तेजन द्या.
ख्रिस्ती जीवन
“तुम्ही JW लायब्ररीचा वापर करत आहात का?”: (१५ मि.) सुरुवातीला लेखावर पाच मिनिटं चर्चा करा. मग “JW लायब्ररी” वापरायला सुरूवात करा हा व्हिडिओ दाखवा आणि थोडक्यात चर्चा करा. त्यानंतर प्रकाशनं डाऊनलोड आणि मॅनेज करा आणि तुमच्या आवडीप्रमाणे वाचण्यासाठी सेटिंग्स करा हे व्हिडिओ दाखवून त्यांवरदेखील थोडक्यात चर्चा करा. १६ मे रोजी होणाऱ्या “आपण JW लायब्ररी कोणकोणत्या गोष्टींसाठी वापरू शकतो” या भागाच्या चर्चेआधी, ज्यांना शक्य आहे त्यांना JW लायब्ररी अॅप इनस्टॉल करण्याचं आणि प्रकाशनं डाऊनलोड करण्याचं उत्तेजन द्या.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) बायबल कथा ११५, ११६
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ७ आणि प्रार्थना