९-१५ मे
स्तोत्रे १-१०
गीत ३० आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“यहोवाबरोबर आपलं शांतीपूर्ण नातं असण्यासाठी येशूचा आदर करणं गरजेचं आहे”: (१० मि.)
[स्तोत्रसंहिता पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
स्तो २:१-३—लोक यहोवा आणि येशूचे शत्रू होतील अशी आधीच भविष्यवाणी करण्यात आली होती (टेहळणी बुरूज०४ ७/१५ पृ. १६-१७, परि. ४-८; इन्साईट-१ पृ. ५०७; इन्साईट-२ पृ. ३८६ परि. ३)
स्तो २:८-१२—यहोवाने अभिषिक्त केलेल्या राजाचा आदर करणाऱ्यांनाच फक्त जीवन मिळेल (टेहळणी बुरूज०४ ८/१ पृ. ५, परि. २-३; टे.बु.०४ ७/१५ पृ. १९, परि. १९)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
स्तो २:७—“परमेश्वराचा निर्णय” याचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०६ ६/१ पृ. ३, परि. ६; टे.बु.०४ ७/१५ पृ. १८, परि. १३)
स्तो ३:२—सेला या शब्दाचा अर्थ काय होतो? (टेहळणी बुरूज०६ ६/१ पृ. ३, परि. ९)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो ८:१-९:१०
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-31 पान १—पुनर्भेटीसाठी पाया घाला.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-31 पान १—पत्रिकेचा वापर करून पुनर्भेट करा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १२ परि. १२-१३—बायबल विद्यार्थ्याला JW लायब्ररी आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करायचं उत्तेजन द्या.
ख्रिस्ती जीवन
यहोवाच्या घराचा आदर करा: (५ मि.) चर्चा. jw.org/mr वरून यहोवाचे मित्र बना—यहोवाच्या घराचा आदर करा हा व्हिडिओ दाखवा. (jw.org/mr वर “व्हिडिओ”> “यहोवाचे मित्र बना” इथं पाहा.) मग लहान मुलांना स्टेजवर बोलवून या व्हिडिओबद्दल प्रश्न विचारा.
पूर्णवेळेच्या सेवेत मिळणारा आनंद: (१० मि.) एक किंवा दोन पूर्णवेळेच्या सेवकांची मुलाखत घ्या. त्यांना ही सेवा सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे प्रोत्साहन मिळालं? पूर्णवेळेची सेवा करत असताना त्यांना कोणते अडथळे आले, आणि कोणत्या गोष्टींमुळे त्यांनी पूर्णवेळेची सेवा चालू ठेवली आहे? त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले? प्रचारकांना उत्तेजन द्या की, त्यांची परिस्थिती असेल तर त्यांनी पायनियरींग करावं.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाची इच्छा पृ. ३ आणि पाठ १-२
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ५४ आणि प्रार्थना