व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

यहोवा तुम्हाला धाडसी बनायला मदत करेल

यहोवा तुम्हाला धाडसी बनायला मदत करेल

शाळेत यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळख करून देण्याची किंवा यहोवाबद्दल इतरांना सांगण्याची तुम्हाला कधी भीती वाटली आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल तर यहोवाबद्दल बोलण्यासाठी तुम्ही धैर्य कसं मिळवू शकता? (१थेस २:२) असं करण्याची कोणती कारणं आहेत? यहोवा तुम्हाला धाडसी बनायला मदत करेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पुढील प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  1. बायबलमधल्या कोणत्या उदाहरणामुळे केतकीला धैर्याने बोलायला मदत मिळाली?

  2. सराव केल्यामुळे केतकीला कशी मदत झाली?

  3. तुम्ही तुमच्या वर्गसोबत्यांना साक्ष का दिली पाहिजे?

  4. तुम्ही शाळेत नसलात तरीही या व्हिडिओमुळे तुम्हाला कोणते धडे शिकायला मिळाले आहेत?