व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

आपल्या समजशक्‍तीला प्रशिक्षण देत राहा

आपल्या समजशक्‍तीला प्रशिक्षण देत राहा

एका खेळाडूला आपलं कौशल्य टिकवून ठेवण्यासाठी सतत कसरत करावी लागते. त्याचप्रमाणे, आपणही आपल्या समजशक्‍तीला टिकवून ठेवण्यासाठी स्वतःला प्रशिक्षण देत राहिलं पाहिजे. (इब्री ५:१४) इतरांनी घेतलेले निर्णय आपणही घ्यावेत असा विचार सहसा आपल्या मनात येतो. पण आपण विचार करून स्वतः निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे. का बरं? कारण आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतःबद्दल देवाला हिशोब देणार आहे.—रोम १४:१२.

मला बाप्तिस्मा घेऊन बरीच वर्षं झाली आहेत, म्हणून मी योग्य निर्णय घेईन, असा विचार आपण करू नये. योग्य निर्णय घ्यायचे असतील तर आपण पूर्णपणे यहोवावर, त्याच्या वचनावर आणि त्याच्या संघटनेकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनावर विसंबून राहिलं पाहिजे.—यहो १:७, ८; नीत ३:५, ६; मत्त २४:४५.

“शुद्ध विवेक टिकवून ठेवा”  हा व्हिडिओ पाहा, आणि खाली दिलेल्या प्रश्‍नाची उत्तरं द्या:

  • इमासमोर कोणती परिस्थिती आली?

  • एखाद्याला त्याच्या विवेकानुसार निर्णय घ्यायची गरज पडते, तेव्हा आपण आपलं व्यक्‍तिगत मत का मांडू नये?

  • एका जोडप्याने इमाला कोणता योग्य सल्ला दिला?

  • इमाला योग्य तो निर्णय घेण्यासाठी कुठे मदत मिळाली?