देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
पूर्ण मनाने यहोवाचं ऐका
कालेबने अगदी सुरवातीपासूनच पूर्ण मनाने यहोवाचं ऐकलं (यहो १४:७, ८)
नंतरसुद्धा एक कठीण जबाबदारी पार पाडताना कालेबने यहोवावर भरवसा ठेवला (यहो १४:१०-१२; टेहळणी बुरूज०४ १२/१ १२ ¶२)
पूर्ण मनाने यहोवाची सेवा केल्यामुळे कालेबला आशीर्वाद मिळाला (यहो १४:१३, १४; टेहळणी बुरूज०६ १०/१ १९ ¶११)
यहोवाच्या मार्गदर्शनानुसार चालल्यामुळे कालेबचा विश्वास वाढला आणि त्याला भरपूर आशीर्वाद अनुभवायला मिळाले. यहोवाची सेवा करत असताना आपल्यालाही जेव्हा आपल्या प्रार्थनांचं उत्तर मिळतं आणि तो कसं मार्गदर्शन पुरवत आहे हे दिसून येतं, तेव्हा आपला विश्वासही आणखी मजबूत होतो.—१यो ५:१४, १५.