व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेवाकार्यासाठी तयार व्हा | सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा

संशोधनाची साधनं वापरा

संशोधनाची साधनं वापरा

आपल्याला चांगलं शिकवता यावं म्हणून यहोवाने आपल्याला बरीच साधनं दिली आहेत. जसं की, व्हिडिओ, पत्रिका, मासिकं, ब्रोशर, पुस्तकं आणि आपलं मुख्य साधन, बायबल. (२ती ३:१६) तसंच शास्त्रवचनं समजावून सांगण्यासाठी त्याने आपल्याला काही संशोधनाची साधनंसुद्धा दिली आहेत. यामध्ये वॉचटावर लायब्ररी, JW लायब्ररी  ॲप, वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी  आणि यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक  ही साधनं येतात.

तेव्हा या सर्व साधनांचा वापर करून तुम्ही देवाच्या वचनात खोलवर संशोधन करायचा प्रयत्न केला, तर तुम्हाला नक्की आनंद होईल. तसंच तुमच्या बायबल विद्यार्थ्यांनाही या साधनांचा वापर करायला शिकवा. असं केल्यामुळे बायबलच्या काही प्रश्‍नांची उत्तरं त्यांना स्वतः शोधता येतील. आणि त्यामुळे त्यांनाही आनंद होईल.

शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—यहोवा देत असलेली मदत स्वीकारा—संशोधनाची साधनं वापरून’   हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • जेडला निर्मितीबद्दल कोणती शंका होती?

  • निताला या विषयावर कुठे माहिती सापडली?

  • शास्त्रवचनांमधली रत्नं शोधून त्याबद्दल इतरांना सांगितल्यामुळे आनंद होतो

    जेडसाठी कोणती माहिती योग्य आहे, हे निताने कसं शोधलं?

  • संशोधन साधनांचा वापर केल्यामुळे निताला कसं वाटलं?