देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
तुम्हाला मिळालेल्या अनमोल वारशाचं रक्षण करा
शक्तिशाली शत्रूंना आपल्या भागातून हाकलून देऊन, कालेबने आपल्या वारशाचं संरक्षण केलं (यहो १५:१४; इन्साइट-१ १०८३ ¶३)
पण काही इस्राएली लोकांनी खोटी उपासना करणाऱ्या लोकांपासून आपल्या प्रदेशाचं संरक्षण केलं नाही (यहो १६:१०; इन्साइट-१ ८४८)
आपल्या वारशाचं संरक्षण करणाऱ्या सर्व इस्राएली लोकांना यहोवाने मदत केली (अनु २०:१-४; यहो १७:१७, १८; इन्साइट-१ ४०२ ¶३)
यहोवाने आपल्याला सर्वकाळाच्या जीवनाचा वारसा दिला आहे. हा मौल्यवान वारसा जपण्यासाठी आणि मोहांपासून आपलं संरक्षण करण्यासाठी आपण नियमित बायबल अभ्यास केला पाहिजे, ख्रिस्ती सभांना उपस्थित राहिलं पाहिजे, सेवाकार्यात सहभाग घेतला पाहिजे आणि प्रार्थना केली पाहिजे.
स्वतःला विचारा, ‘मी माझा वारसा जपतोय का?’