ख्रिस्ती जीवन
आर्थिक समस्यांचा धैर्याने सामना करा
शेवटल्या काळात जीवन दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. जसजसं आपण अंताच्या जवळ जाऊ, तसतशा समस्या आणखीनच वाढतील यात शंका नाही. कदाचित आपल्याला गरजेच्या गोष्टी मिळणंसुद्धा मुश्कील होईल. (हब ३:१६-१८) मग अशा हलाखीच्या परिस्थितीला धैर्याने तोंड देण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? अशा परिस्थितीतही यहोवा देवावर आपला भरवसा टिकवून ठेवणं महत्त्वाचं असेल. कारण त्याने वचन दिलंय, की तो आपल्या सेवकांची काळजी घेईल आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या गरजा पूर्ण करेल.—स्तो ३७:१८, १९; इब्री १३:५, ६.
तुम्ही या गोष्टी करू शकता:
-
बुद्धी, मार्गदर्शन आणि मदतीसाठी यहोवाला विनंती करा.—स्तो ६२:८
-
पूर्वी कधीच केलं नसेल असं काम करायलाही तयार असा.—सजग होइए! ४/१० ३०-३१, चौकटी
-
उपासनेशी संबंधित गोष्टी नियमितपणे करत राहा. जसं की, दररोज बायबल वाचणं, सभांना जाणं आणि सेवाकार्यात भाग घेणं
टिकून राहील असं घर बांधा—“आहे त्यात समाधानी रहा” हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
काही कुटुंबांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला?
-
जीवनात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे?
-
आर्थिक समस्यांचा सामना करत असलेल्यांना आपण कशी मदत करू शकतो?