व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

कायम जीवनाचा आनंद घ्या!  या पुस्तकातली आणखी काही वैशिष्ट्यं

कायम जीवनाचा आनंद घ्या!  या पुस्तकातली आणखी काही वैशिष्ट्यं

कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातल्या व्हिडिओंचा आणि विचार करायला लावणाऱ्‍या प्रश्‍नांचा वापर करायला तुम्हाला आवडतं का? “काही जण म्हणतात,” “ध्येय” आणि “हेसुद्धा पाहा” या वैशिष्ट्यांबद्दल काय? शिष्य बनवण्याच्या कामात सहभाग घेताना या पुस्तकातल्या आणखी कोणत्या वैशिष्ट्यांची तुम्हाला मदत होऊ शकेल?—मत्त २८:१९, २०.

मिडिया: जर तुम्हाला छापील पुस्तकातून अभ्यास घ्यायला आवडत असेल तर मग व्हिडिओ आणि इतर साहित्य एकाच ठिकाणी सापडेल अशी काही सोय आहे का? हो. त्यासाठी तुम्ही पुस्तकाची इलेक्ट्रॉनिक आवृत्ती उघडून चारपैकी एक भाग सिलेक्ट करा. धड्यांची नावं संपल्यावर शेवटी तुम्हाला ‘मिडिया’ म्हणून एक बॉक्स दिसेल. या बॉक्सवर क्लिक केल्यावर तुम्हाला त्या भागासाठी असलेले सगळे व्हिडिओ वगैरे बघायला मिळतील. (चित्र क्रमांक १ पाहा.)

“Printed Edition” किंवा “छापील आवृत्ती” सेटिंग: तुम्ही जर फोन किंवा टॅबमधून अभ्यास घेत असाल तर तुम्हाला “Printed Edition” या सेटिंगचा वेळोवेळी उपयोग होईल. धडा उघडला असेल तर वरच्या बाजूला उजवीकडे असलेल्या तीन टिंबांवर क्लिक करा आणि “Printed Edition” सिलेक्ट करा. त्यामुळे तुम्हाला एकाच वेळी पूर्ण पान दिसेल. आणि धड्यातले वेगवेगळे मुद्दे धड्याच्या मुख्य विषयाशी कसे संबंधित आहेत, हे लक्षात घ्यायला मदत होईल. पुन्हा इलेक्ट्रॉनिक आवृत्ती पाहण्यासाठी तुम्ही परत तीन टिंबांवर क्लिक करून “Digital Edition” सिलेक्ट करू शकता किंवा मग खाली जांभळ्या रंगाच्या आयकॉनवर क्लिक करू शकता.

“मी तयार आहे का?”: भाग चारच्या शेवटी असणाऱ्‍या या चौकटीमध्ये मंडळीसोबत प्रचार करण्यासाठी आणि बाप्तिस्मा घेण्यासाठी असलेल्या आवश्‍यक पात्रता दिल्या आहेत. (चित्र क्रमांक २ पाहा.)

काही विषयांवर स्पष्टीकरण: या भागात काही महत्त्वाच्या विषयांबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. इलेक्ट्रॉनिक आवृत्तीत या भागातल्या प्रत्येक विषयाच्या शेवटी एक लिंक दिली आहे. ही लिंक तुम्हाला धड्यात तुम्ही जिथे होता तिथे घेऊन जाईल. (चित्र क्रमांक २ पाहा.)

प्रगती करणाऱ्‍या बायबल विद्यार्थ्यासोबत कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातून शेवटपर्यंत अभ्यास करा, मग त्याचा बाप्तिस्मा झाला असला तरीसुद्धा. बाप्तिस्मा झालेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतानाही तुम्ही वेळ, पुनर्भेट आणि अभ्यास मोजू शकता. तुमच्यासोबत अभ्यासाला येणारा प्रचारकसुद्धा वेळ मोजू शकतो