२-८ ऑक्टोबर
ईयोब १-३
गीत १४१ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“तुमचं यहोवावर किती गाढ प्रेम आहे ते दाखवत राहा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
ईयो १:१०—मत्तय २७:४६ मध्ये येशूने जे म्हटलं ते समजून घेण्यासाठी या वचनामुळे आपल्याला कशी मदत होते? (टेहळणी बुरूज२१.०४ ११ ¶९)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) ईयो ३:१-२६ (शिकवणे अभ्यास १२)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. तसंच त्या व्यक्तीला आपल्या वेबसाईटबद्दल सांगा आणि jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे अभ्यास ९)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. बायबलचा अभ्यास का करावा? या व्हिडिओबद्दल सांगा (व्हिडिओ दाखवू नका) आणि त्यावर चर्चा करा. (शिकवणे अभ्यास २०)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज२२.०१ ११-१२ ¶११-१४—विषय: याकोबसारखे चांगले शिक्षक बना—समंजस आणि नम्र राहा. (शिकवणे अभ्यास १८)
ख्रिस्ती जीवन
मला वाटायचं की माझं सगळं व्यवस्थित चाललंय: (१० मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्न विचारा: ब्रदर बर्डवेल यांना ‘आपलं सगळं काही व्यवस्थित चाललंय’ असं का वाटत होतं?
मत्तय ६:३३ या वचनावर विचार केल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन कसा बदलला?
ब्रदर बर्डवेल यांच्या कुटुंबाबद्दल तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टी आवडल्या?
“JW.ORG वेबसाईटच्या होम पेजचा प्रचारात वापर करा”: (५ मि.) चर्चा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय २२ ¶२३-३१, २२क
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १२९ आणि प्रार्थना