व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१६-२२ सप्टेंबर

स्तोत्रं ८५-८७

१६-२२ सप्टेंबर

गीत ४१ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. प्रार्थनेमुळे आपल्याला परीक्षांमध्ये टिकून राहायला मदत होते

(१० मि.)

आनंदी राहायला यहोवाकडे मदत मागा (स्तो ८६:४)

विश्‍वासू राहायला यहोवाकडे मदत मागा (स्तो ८६:११, १२; टेहळणी बुरूज१२ ५/१५ २५ ¶१०)

यहोवा तुमच्या प्रार्थनांचं उत्तर देईल असा भरवसा ठेवा (स्तो ८६:६, ७; टेहळणी बुरूज२३.०५ १३ ¶१७-१८)


स्वतःला विचारा, ‘संकटांचा सामना करत असताना मी बऱ्‍याचदा प्रार्थना करतो का आणि प्रार्थनेत जास्त वेळ घालवतो का?’—स्तो ८६:३.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ८६:११​—दावीदच्या प्रार्थनेवरून एखाद्याच्या मनाबद्दल किंवा हृदयाबद्दल काय कळतं? (इन्साइट-१ १०५८ ¶५)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. बायबल अभ्यास करायला आवडेल का ते विचारा. (शिष्य बनवा  धडा ३ मुद्दा ५)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. एका व्यक्‍तीने आधी सध्याच्या घटनेबद्दल चिंता व्यक्‍त केली होती. त्याला बायबल अभ्यास करायला आवडेल का ते विचारा. (शिष्य बनवा  धडा ७ मुद्दा ४)

६. शिष्य बनवण्यासाठी

(५ मि.) कायम आनंद घ्या!  धडा १५ मुद्दा ५. पुढच्या आठवड्यात तुम्ही अभ्यास घ्यायला प्रत्यक्ष नसल्यामुळे, बायबल अभ्यासाची काय व्यवस्था करता येईल यावर विद्यार्थ्यासोबत चर्चा करा. (शिष्य बनवा  धडा १० मुद्दा ४)

ख्रिस्ती जीवन

गीत ८३

७. हार मानू नका

(५ मि.) चर्चा.

व्हिडिओ दाखवा. मग विचारा:

  •   आपण प्रचार करायला नको असं आपल्याला कधीकधी का वाटू शकतं?

  •   आपण हार का मानू नये?

८. बायबल अभ्यासासाठी विचारत राहा!

(१० मि.) चर्चा.

या महिन्याच्या खास मोहिमेत तुम्ही कायम जीवनाचा आनंद घ्या!  या माहितीपत्रकाचा वापर करून बायबल अभ्यास सुरू केला आहे का? जर असेल, तर तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल! तुमच्या या चांगल्या अनुभवामुळे इतरांनाही तसं करायचं प्रोत्साहन मिळालं असेल. पण जर तुम्हाला अजून बायबल अभ्यास सुरू करता आला नसेल, तर कदाचित आपल्या मेहनतीचा काही फायदा नाही असं तुम्हाला वाटेल. यामुळे जर तुम्ही निराश झाला असाल तर तुम्ही काय करू शकता?

आम्ही देवाचे सेवक म्हणून स्वतःची शिफारस करतो​—धीराने प्रचार करताना  हा व्हिडिओ दाखवा. मग विचारा:

  •   ‘आपलं सेवाकार्य काहीच उपयोगाचं नाही’ असं जर कधी वाटलं, तर २ करिंथकर ६:४, ६ या वचनांमुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते?

  •   बायबल अभ्यास सुरू करायला तुम्ही घेत असलेल्या मेहनतीचा काहीच उपयोग नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कोणते फेरबदल करू शकता?

लक्षात असू द्या, की तुम्ही किती बायबल अभ्यास सुरू केले किंवा करत आहात यावर तुमचा आनंद अवलंबून नाही. तर तुम्ही घेत असलेल्या मेहनतीबद्दल यहोवा खूश आहे यावर खरंतर तुमचा आनंद अवलंबून आहे. (लूक १०:१७-२०) तेव्हा, “प्रभूच्या सेवेत तुमची मेहनत कधीही वाया जाणार नाही” हे लक्षात ठेवून या खास मोहिमेत मनापासून भाग घेत राहा!​—१कर १५:५८.

९. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ३९ आणि प्रार्थना