२१-२७ ऑक्टोबर
स्तोत्रं १००-१०२
गीत ३७ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल कदर दाखवा
(१० मि.)
यहोवाबद्दल गाढ प्रेम विकसित करा (स्तो १००:५; टेहळणी बुरूज२३.०३ १२ ¶१८-१९)
यहोवासोबतची मैत्री धोक्यात येईल अशा गोष्टी टाळा (स्तो १०१:२, ३; टेहळणी बुरूज२३.०२ १७ ¶१०)
यहोवा आणि त्याच्या संघटनेची बदनामी करणाऱ्यांपासून दूर राहा (स्तो १०१:५; टेहळणी बुरूज११ ७/१५ १६ ¶७-८)
स्वतःला विचारा, ‘मी ज्या प्रकारे सोशल मिडियाचा वापर करतोय, त्यामुळे यहोवासोबतचं माझं नातं धोक्यात येऊ शकतं का?’
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
स्तो १०२:६—स्तोत्रकर्ता स्वतःची तुलना पाणकोळ्याशी का करतो? (इन्साइट-२ ५९६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) स्तो १०२:१-२८ (शिकवणे अभ्यास १२)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ३)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(५ मि.) घरोघरचं साक्षकार्य. बायबल अभ्यास करायला आवडेल का ते विचारा. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ४)
६. विश्वासाबद्दल समजावून सांगणं
(४ मि.) प्रात्यक्षिक. बायबलमधून प्रश्नांची उत्तरं १२९—विषय: बायबलच्या मूळ मजकुरात फेरफार झाले आहेत का? (शिकवणे अभ्यास ८)
गीत १३७
७. ‘मी तुला धरून राहीन, तू मला आधार दे’
(१५ मि.)
चर्चा. हा व्हिडिओ दाखवा. मग विचारा:
हन्नाने एकनिष्ठ प्रेम कसं दाखवलं?
आपण तिचं अनुकरण कसं करू शकतो?
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) साक्ष द्या अध्या. १७ ¶१-७