व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२३-२९ सप्टेंबर

स्तोत्रं ८८-८९

२३-२९ सप्टेंबर

गीत २२ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. यहोवाची राज्य करायची पद्धत सगळ्यात चांगली आहे

(१० मि.)

यहोवा नेहमीच न्यायाने राज्य करतो (स्तो ८९:१४; टेहळणी बुरूज१७.०६ २८ ¶५)

यहोवा ज्या प्रकारे राज्य करतो त्यामुळे लोकांना खरा आनंद मिळतो (स्तो ८९:१५, १६; टेहळणी बुरूज१७.०६ २९ ¶१०-११)

यहोवाचं राज्य कायम टिकेल (स्तो ८९:३४-३७; टेहळणी बुरूज१४ १०/१५ १० ¶१४)

एखाद्या राजकीय पक्षाचा विचार चांगलाय असं जेव्हा दाखवण्यात येतं, तेव्हा यहोवाची राज्य करायची पद्धत सगळ्यात चांगली आहे यावर मनन केल्यामुळे आपल्याला निष्पक्ष राहायला मदत होते

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ८९:३७​—विश्‍वसनीय आणि एकनिष्ठ असण्यात काय फरक आहे? (यहोवा के करीब २८१ ¶४-५)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. ख्रिस्ती नसलेल्या व्यक्‍तीला बायबल अभ्यास करायला आवडेल का ते विचारा. (शिष्य बनवा  धडा ५ मुद्दा ५)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. बायबल अभ्यास कसा चालवला जातो ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास ९)

६. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) भाषण. कायम आनंद घ्या!  धडा १ मुद्दे १-२​—विषय: बायबलमध्ये काय सांगितलंय? (शिकवणे  अभ्यास २)

ख्रिस्ती जीवन

गीत ९४

७. यहोवाचे स्तर सगळ्यात चांगले आहेत!

(१० मि.) चर्चा.

बऱ्‍याच लोकांना वाटतं की शारीरिक संबंध आणि लग्नाबद्दल बायबलचे स्तर खूप कडक आणि जुने आहेत. पण यहोवाच्या स्तरांप्रमाणे वागल्यामुळे आपला नेहमीच फायदा होतो, याची तुम्हाला पक्की खातरी पटली आहे का?​—यश ४८:१७, १८; रोम १२:२.

बायबल शिकवतं की जे देवाच्या नैतिक स्तरांकडे दुर्लक्ष करतात ते “देवाच्या राज्याचे वारस होणार नाहीत.” (१कर ६:९, १०) पण फक्‍त याच कारणामुळे आपण देवाचे स्तर पाळले पाहिजेत का?

विश्‍वासाची कारणं​—स्वतःच्या नाही तर देवाच्या स्तरांनुसार जगणं  हा व्हिडिओ दाखवा. मग विचारा:

  •   देवाच्या नैतिक स्तरांमुळे आपलं संरक्षण कसं होतं?

८. मंडळीच्या गरजा

(५ मि.)

९. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १३३ आणि प्रार्थना