व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२८ ऑक्टोबर–३ नोव्हेंबर

स्तोत्रं १०३-१०४

२८ ऑक्टोबर–३ नोव्हेंबर

गीत ३० आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. “आपण फक्‍त माती आहोत, हे तो आठवणीत ठेवतो”

(१० मि.)

यहोवा करुणामय देव असल्यामुळे तो समजूतदारपणा दाखवतो (स्तो १०३:८; टेहळणी बुरूज२३.०७ २१ ¶५)

आपण चुका करतो तेव्हा तो आपल्याकडे पाठ फिरवत नाही (स्तो १०३:९, १०; टेहळणी बुरूज२३.०९ ६-७ ¶१६-१८)

आपल्याला जे जमणार नाही, त्याची अपेक्षा तो आपल्याकडून कधीच करत नाही (स्तो १०३:१४; टेहळणी बुरूज२३.०५ २६ ¶२)

स्वतःला विचारा, ‘मी माझ्या जोडीदारासोबत जसं वागतो त्यातून यहोवासारखा समजूतदारपणा दिसून येतो का?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो १०४:२४​—नवीन आणि वेगवेगळ्या गोष्टी निर्माण करण्याच्या यहोवाच्या ताकदीबद्दल या वचनातून काय शिकायला मिळतं? (यहोवा के करीब  ५५ ¶१८)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. (शिष्य बनवा  धडा ३ मुद्दा ४)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. बायबल अभ्यास करायला तयार झालेल्या व्यक्‍तीसोबत चला, बायबलमधून शिकू या!  या व्हिडिओवर चर्चा करा. (शिकवणे  अभ्यास ९)

६. भाषण

(५ मि.) शिष्य बनवा  आणखी माहिती क मुद्दा ६​—विषय: पती “जसं स्वतःवर प्रेम करतो, तसंच त्याने आपल्या पत्नीवरही प्रेम” केलं पाहिजे. (शिकवणे  अभ्यास १)

ख्रिस्ती जीवन

गीत ४४

७. तुम्हाला तुमच्या मर्यादा माहीत आहेत का?

(१५ मि.) चर्चा.

आपण जेव्हा यहोवाला आपलं सगळ्यात चांगलं ते देतो तेव्हा त्याला आनंद होतो. आणि त्यासोबतच आपल्यालाही आनंद होतो. (स्तो ७३:२८) पण असं करताना आपण आपल्या मर्या़दांचा विचार न केल्यामुळे विनाकारण चिंता आणि निराशा येऊ शकते.

स्वतःकडून खूप जास्त अपेक्षा करू नका  हा व्हिडिओ दाखवा. मग विचारा:

  •   यहोवा आपल्याकडून कशाची अपेक्षा करतो? (मीख ६:८)

  •   आपलं ध्येय गाठताना जास्त चिंता न करण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या तरुण बहिणीला कशामुळे मदत झाली?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ५५ आणि प्रार्थना