व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२-८ सप्टेंबर

स्तोत्रं ७९-८१

२-८ सप्टेंबर

गीत २९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. यहोवाच्या वैभवी नावावर प्रेम असल्याचं दाखवा

(१० मि.)

यहोवाचा अनादर करणाऱ्‍या गोष्टींपासून दूर राहा (स्तो ७९:९; टेहळणी बुरूज१७.०२ ९ ¶५)

यहोवाच्या नावाने त्याला हाक मारा (स्तो ८०:१८; बायबल व्हर्सेस एक्सप्लेंड ३ ¶४-५)

जे यहोवाच्या आज्ञा पाळून त्याच्या नावावरचं प्रेम दाखवतात त्यांना तो भरभरून आशीर्वाद देतो (स्तो ८१:१३, १६)

आपल्याला जर आपल्या कामांनी यहोवाच्या नावाचा महिमा करायचा असेल, तर आपण लोकांना सांगितलं पाहिजे की आपण यहोवाचे साक्षीदार आहोत

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ८०:१​—इस्राएलच्या सर्व वंशांना सूचित करण्यासाठी योसेफच्या नावाचा काही वेळा उल्लेख का करण्यात आलाय? (इन्साइट-२ १११)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(१ मि.) घरोघरचं साक्षकार्य. बायबल अभ्यास करायला आवडेल का ते विचारा. (शिष्य बनवा  धडा ४ मुद्दा ४)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. बायबल अभ्यास करायला आवडेल का ते विचारा. (शिष्य बनवा  धडा ४ मुद्दा ३)

६. संभाषण सुरू करण्यासाठी

(२ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. बायबल अभ्यास करायला आवडेल का ते विचारा. (शिष्य बनवा  धडा ३ मुद्दा ३)

७. पुन्हा भेटण्यासाठी

(५ मि.) घरोघरचं साक्षकार्य. पूर्वी बायबलच्या संदेशात आवड दाखवलेल्या, पण बायबल अभ्यासाला नाही म्हटलेल्या व्यक्‍तीला आता बायबल अभ्यास करायला आवडेल का ते विचारा. (शिष्य बनवा  धडा ८ मुद्दा ३)

ख्रिस्ती जीवन

गीत १०

८. “ते माझ्या नावाचा आदर करतील”

(१५ मि.) चर्चा.

सैतानाने एदेन बागेत यहोवाच्या नावाची बदनामी करायला सुरुवात केली. तेव्हापासून सर्व मानवांना आणि स्वर्गदूतांना ते देवाच्या नावाचा आदर करतील की नाही हा महत्त्वाचा निर्णय घ्यायचाय.

सैतानाने यहोवाबद्दल पसरवलेल्या काही खोट्या गोष्टी लक्षात घ्या. सैतानाने यहोवावर तो एक क्रूर शासक असल्याचा आरोप लावलाय. (उत्प ३:१-६; ईयो ४:१८, १९) तसंच, तो दावा करतो की यहोवाचे उपासक मनापासून त्याच्यावर प्रेम करत नाहीत, तर फक्‍त दिखावा करतात. (ईयो २:४, ५) इतकंच काय, तर त्याने लाखो लोकांना असं मानायला लावलंय की हे सुंदर विश्‍व यहोवाने निर्माण केलेलं नाही.​—रोम १:२०, २१.

या सगळ्या खोट्या गोष्टी ऐकून तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला नक्कीच यहोवाची बाजू घेऊन त्याच्या वतीने बोलावंसं वाटेल. यहोवाला माहीत आहे की त्याच्या लोकांना त्याचं नाव पवित्र करायचंय आणि त्याला आदर द्यायचाय. (यशया २९:२३ सोबत तुलना करा.) मग तुम्ही हे कसं करू शकता?

  • यहोवाला जाणून घ्यायला आणि त्याच्यावर प्रेम करायला लोकांना मदत करा. (योह १७:२५, २६) यहोवाच्या अस्तित्वाचे पुरावे द्यायला आणि त्याच्या अद्‌भुत गुणांबद्दल इतरांना शिकवायला तयार राहा.​—यश ६३:७

  • यहोवावर मनापासून प्रेम करा. (मत्त २२:३७, ३८) यहोवाच्या आज्ञा पाळा. त्या तुमच्या फायद्याच्या आहेत फक्‍त त्यासाठीच नाही, तर तुम्हाला त्याला खूश करायचंय म्हणून पाळा.​—नीत २७:११

प्रेम कधीही नाहीसे होत नाही . . . शाळेत चुकीच्या गोष्टी घडत असल्या तेव्हाही  हा व्हिडिओ दाखवा. आणि विचारा:

  •   एरियल आणि दिएगोने यहोवाच्या नावाचा आदर कसा केला?

  •   त्यांनी यहोवाची बाजू का घेतली?

  •   तुम्ही त्यांच्यासारखं कसं वागू शकता?

९. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ८७ आणि प्रार्थना