व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

७-१३ ऑक्टोबर

स्तोत्रं ९२-९५

७-१३ ऑक्टोबर

गीत ८४ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. यहोवाची सेवा करणं हा जीवन जगण्याचा सगळ्यात चांगला मार्ग आहे!

(१० मि.)

यहोवालाच आपली उपासना मिळवण्याचा हक्क आहे (स्तो ९२:१,; टेहळणी बुरूज१८.०४ २६ ¶५)

तो त्याच्या लोकांना योग्य निर्णय घ्यायला मदत करतो आणि त्यामुळे ते आनंदी असतात (स्तो ९२:५; टेहळणी बुरूज१८.११ २० ¶८)

यहोवाला अशा लोकांची कदर आहे जे म्हातारपणातही त्याची सेवा करतात (स्तो ९२:१२-१५; टेहळणी बुरूज२०.०१ १९ ¶१८)

स्वतःला विचारा, ‘यहोवाला माझं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेण्यापासून कोणती गोष्ट मला रोखत आहे?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ९२:५​—या शब्दांवरून यहोवाच्या बुद्धीबद्दल काय स्पष्ट होतं? (यहोवा के करीब  १७६ ¶१८)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. तुम्ही बायबल शिकवण्याचं जे काम करता, त्याबद्दल सहज बोलता-बोलता समोरच्याला सांगा. (शिष्य बनवा  धडा ५ मुद्दा ३)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. पूर्वी बायबलच्या संदेशात आवड दाखवलेल्या, पण बायबल अभ्यासाला नाही म्हटलेल्या व्यक्‍तीला आता बायबल अभ्यास करायला आवडेल का ते विचारा. (शिष्य बनवा  धडा ८ मुद्दा ४)

६. शिष्य बनवण्यासाठी

(५ मि.) प्रगती न करणाऱ्‍या बायबल विद्यार्थ्यासोबत चर्चा. (शिष्य बनवा  धडा १२ मुद्दा ५)

ख्रिस्ती जीवन

गीत ५

७. तरुण चिंतेच्या ओझ्याखाली दबून जातात तेव्हा . . .

(१५ मि.) चर्चा.

यहोवाची सेवा करणाऱ्‍यांनासुद्धा चिंतांचा सामना करावा लागतो. उदाहरणार्थ, दावीदला खूपदा आपल्या आयुष्यात चिंतेचा सामना करावा लागला. आणि आज आपल्या बऱ्‍याच भाऊबहिणींनाही यातून जावं लागतंय. (स्तो १३:२; १३९:२३) पण दुःखाची गोष्ट म्हणजे तरुणांनाही चिंतेची झळ बसली आहे. यामुळे कधीकधी त्यांना दररोजची कामंही नीट करता येत नाहीत, जसं की शाळेला किंवा मंडळीच्या सभांना जाणं. चिंतेमुळे गंभीर परिणाम होऊ शकतात; कदाचित एखाद्याला पॅनिक अटॅक म्हणजे खूप जास्त घाबरल्यासारखं वाटू शकतं किंवा मनात आत्महत्येचे विचारही येऊ शकतात.

तरुणांनो, जर कधी तुम्हाला चिंतेच्या ओझ्याखाली दबून गेल्यासारखं वाटलं, तर आपल्या आईवडिलांकडे किंवा एखाद्या प्रौढ व्यक्‍तीकडे आपलं मन मोकळं करा. तसंच यहोवालाही प्रार्थना करा. (फिलि ४:६) तो तुम्हाला नक्की मदत करेल. (स्तो ९४:१७-१९; यश ४१:१०) आता स्टींगच्या उदाहरणावर लक्ष द्या.

यहोवाने माझी काळजी घेतली  हा व्हिडिओ दाखवा. मग विचारा:

स्टींगला कोणत्या वचनामुळे मदत झाली आणि का?

यहोवाने त्याची काळजी कशी घेतली?

आईवडिलांनो, तुमच्या मुलांचं लक्ष देऊन ऐका, तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे त्यांना सांगा. यहोवाच्या प्रेमावर त्यांचा भरवसा वाढवायला त्यांना मदत करा. अशा प्रकारे, तुम्ही त्यांना चिंतेचा यशस्वीपणे सामना करायला मदत करू शकता. (तीत २:४; याक १:१९) तुमच्या मुलांना आधार द्यायला लागणारं बळ आणि सांत्वन यहोवा तुम्हाला देईल, म्हणून त्याच्यावर विसंबून राहा.

आपल्या मंडळीत असे भाऊबहीण असतील जे खूप जास्त चिंतेचा सामना करत असतील. कदाचित त्यांच्याबद्दल आपल्याला माहीत नसेल. तसंच, त्यांना कसं वाटतं हे आपल्याला माहीत नसेल. पण तरी आपण मंडळीतल्या सगळ्यांसाठी काहीतरी करून त्यांना याची जाणीव करून देऊ शकतो, की आपलं त्यांच्यावर मनापासून प्रेम आहे आणि आपण त्यांना आपलं मानतो.​—नीत १२:२५; इब्री १०:२४.

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ८१ आणि प्रार्थना