व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नमुना सादरीकरणं

नमुना सादरीकरणं

दुःख कधी संपेल का? (T-34 पान १)

प्रश्न: [तुमच्या परिसरात घडलेल्या एका दुःखद घटनेबद्दल उल्लेख करून या पत्रिकेचं शीर्षक दाखवा आणि असं विचारा] या प्रश्‍नाचं तुम्ही काय उत्तर द्याल, दुःख कधी संपेल का? हो? नाही? किंवा माहीत नाही?

वचन: स्तोत्र ३७:९-११

सादरता: दुःखाचा अंत होईल असा आपण विश्वास का बाळगू शकतो, ते या पत्रिकेत सांगितलं आहे.

दुःख कधी संपेल का? (T-34 पान ४)

प्रश्न: आज आपल्याला सगळीकडे दुष्टता पाहायला मिळते आणि कित्येक वेळा निरपराध लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो. देवाने या दुःखाला का अनुमती दिली असं तुम्हाला वाटतं?

वचन: २पेत्र ३:९

सादरता: लवकरच दुःख का संपेल याची दोन कारणं या पत्रिकेत दिली आहेत.

सत्य शिकवा

प्रश्न: देव आपली काळजी करतो हे आपल्याला कशावरून कळतं?

वचन: १पेत्र ५:७

सत्य: देव आपली काळजी करतो म्हणून, आपण त्याला प्रार्थना करावी असं तो आर्जवतो.

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.