ख्रिस्ती जीवन
बायबल अभ्यास घेताना या गोष्टी टाळा
जास्त बोलणं: तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजवण्याची गरज आहे असा विचार करू नका. लोकांनी स्वतः विचार करून त्यांना योग्य काय ते कळावं, यासाठी येशूने प्रश्नांचा वापर केला. (मत्त १७:२४-२७) प्रश्न विचारल्याने बायबल अभ्यास कंटाळवाणा होणार नाही आणि विद्यार्थ्याला काय समजलं, त्याचा काय विश्वास आहे हेदेखील तुम्हाला कळेल. (सेवा स्कूल पृ. २५३ परि. ३-४) जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता, तेव्हा धीर धरा आणि विद्यार्थी उत्तर देईपर्यंत थांबा. जर त्याने चुकीचं उत्तर दिलं तर त्याला योग्य उत्तर सांगण्याऐवजी, असे प्रश्न विचारा ज्यामुळे तो स्वतःच योग्य उत्तर देईल. (सेवा स्कूल पृ. २३८ परि. १-२) विद्यार्थ्याला नवीन विचार समजवताना बोलण्याचा वेग कमी ठेवा.—सेवा स्कूल पृ. २३० परि. ४.
विषय कठीण करणं: एखाद्या विषयावर सर्व माहिती देण्याचा मोह टाळा. (योहा १६:१२) परिच्छेदातील मुख्य मुद्दा समजवण्यावर लक्ष केंद्रित करा. (सेवा स्कूल पृ. २२६ परि. ४-५) त्या विषयावरील इतर माहिती कितीही चांगली असली, तरी त्यामुळे मुख्य मुद्दा बाजूला राहू शकतो. (सेवा स्कूल पृ. २३५ परि. ३) विद्यार्थ्याला मुख्य मुद्दा समजला असेल तर तुम्ही पुढील परिच्छेदावर चर्चा करू शकता.
फक्त अभ्यास संपवणे: आपला उद्देश फक्त अभ्यास संपवण्याचा नसून विद्यार्थ्याच्या मनापर्यंत पोहचण्याचा आहे. (लूक २४:३२) धड्यात दिलेल्या मुख्य शास्त्रवचनांवर लक्ष केंद्रित करून, देवाच्या वचनात असलेल्या शक्तीचा वापर विद्यार्थ्याच्या मनापर्यंत पोहचण्यासाठी करा. (२करिं १०:४; इब्री ४:१२; सेवा स्कूल पृ. १४४ परि. १-३) सोपी उदाहरणं वापरा. (सेवा स्कूल पृ. २४५ परि. २-४) विद्यार्थ्याच्या वैयक्तिक समस्यांचा आणि तो काय विश्वास करतो याचा विचार करून, धड्यातील विषय त्याला कसा लागू होतो ते शिकवा. तुम्ही पुढील प्रश्न विचारू शकता: “तुम्ही जे शिकत आहात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?” “यातून आपण यहोवाबद्दल काय शिकतो?” “हा सल्ला आपल्या जीवनात लागू केल्याने काय फायदा होऊ शकतो?”—सेवा स्कूल पृ. २३८, परि. ३-५; पृ. २५९, परि.१.