व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

सेवाकार्यातील आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—आवड दाखवणाऱ्यांना सभांना येण्याचं उत्तेजन द्या

सेवाकार्यातील आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—आवड दाखवणाऱ्यांना सभांना येण्याचं उत्तेजन द्या

हे का महत्त्वाचं: सभांमध्ये यहोवाची स्तुती करण्याची आणि गीतं गाऊन त्याचे गुणगान करण्याची आपल्याला नियमित संधी मिळते. (स्तो १४९:१) यहोवाची इच्छा आपल्याला कशी पूर्ण करता येईल, हे आपल्याला सभांमध्ये शिकवलं जातं. (स्तो १४३:१०) बायबल विद्यार्थी आणि आवड दाखवणारे, सभांना येऊ लागल्यावर लवकर प्रगती करतात असं दिसून आलं आहे.

हे कसं करावं:

  • आवड दाखवणाऱ्यांना शक्य तितक्या लवकर सभांना यायचं निमंत्रण द्या. आपल्याला त्यांचा बायबल अभ्यास सुरू होईपर्यंत थांबण्याची गरज नाही.—प्रक २२:१७

  • आवड दाखवणाऱ्यांना पुढील सभेत काय होणार आहे आणि कशावर चर्चा केली जाणार आहे हे आधीच समजवा. यासाठी तुम्हाला पुढील गोष्टींमुळे मदत होईल: मंडळीच्या सभेची आमंत्रणपत्रिका, यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? हा व्हिडिओ आणि यहोवाची इच्छा या माहितीपत्रकातील आणि हे धडे

  • मदत करा. आवड दाखवणाऱ्या व्यक्तीला सभेपर्यंत पोहचण्यासाठी मदतीची गरज आहे का? किंवा त्यांना सभेसाठी कोणते कपडे योग्य असतील हा प्रश्न पडला आहे का? सभेमध्ये त्यांच्या शेजारी बसा आणि तुमच्या मासिकातून किंवा पुस्तकातून त्यांना लेख दाखवा. त्यांची इतरांशी ओळख करून द्या