व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्र ११९

“यहोवाच्या नियमशास्त्राप्रमाणे चाला”

“यहोवाच्या नियमशास्त्राप्रमाणे चाला”

यहोवाच्या नियमशास्त्राप्रमाणे चालत राहणं म्हणजे स्वेच्छेने त्याच्या पवित्र मार्गदर्शनानुसार चालणं. स्तोत्रकर्त्याप्रमाणे, आपल्याकडे बायबलमधील अनेक व्यक्तींची उदाहरणं आहेत ज्यांनी यहोवाच्या नियमांचं पालन केलं आणि त्याच्यावर भरवसा ठेवला.

देवाच्या नियमांचं पालन केल्याने आपल्याला खरा आनंद मिळतो

११९:१-८

यहोशवाने यहोवाच्या मार्गदर्शनावर पूर्ण भरवसा ठेवला. त्याला माहीत होतं की यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी यहोवावर पूर्ण मनाने विश्वास ठेवणं गरजेचं आहे

जीवनातील समस्यांचा सामना करण्याचं धैर्य आपल्याला देवाच्या वचनातून मिळतं

११९:३३-४०

यिर्मयाने कठीण प्रसंगात धाडस दाखवलं आणि देवावर भरवसा ठेवला. त्याने आपली जीवनशैली साधी ठेवली आणि दिलेल्या कामात टिकून राहिला

देवाच्या वचनाचं अचूक ज्ञान असल्यामुळे आपल्याला प्रचार करायला आत्मविश्वास मिळतो

११९:४१-४८

पौलाने देवाचा संदेश निर्भीडपणे सर्वांना सांगितला. सुभेदार फेलिक्स याला धैर्याने प्रचार करताना, यहोवा त्याची मदत करेल याचा पौलाला पूर्ण भरवसा होता

पुढील ठिकाणी प्रचार करताना मी आत्मविश्वास कसा दाखवू शकतो?

  • शाळेत

  • कामावर

  • कुटुंबात

  • इतर ठिकाणी