व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

प्रचार करताना लहान मुलाने दार उघडलं तर

प्रचार करताना लहान मुलाने दार उघडलं तर

प्रचार करताना जर लहान मुलाने दार उघडलं, तर आपल्याला त्याच्या आईवडिलांशी बोलायचं आहे असं आपण त्याला सांगू शकतो. असं केल्याने आपण त्याच्या पालकांच्या मस्तकपदाला आदर दाखवतो. (नीति ६:२०) मुलाने जर आपल्याला घरात बोलवलं तर आपण आत जाऊ नये. जर त्याचे आईवडील घरी नसतील तर आपण इतर वेळी जाऊन त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू शकतो.

मुलगा जरी मोठा असला, म्हणजे १५ ते १९ या वयोगटातील असला, तरीसुद्धा आपण त्याच्या आईवडिलांशी बोललं पाहिजे. जर ते घरात नसतील तर आपण मुलाला विचारू शकतो “तुला तुझे आईबाबा तुझ्या आवडीची पुस्तकं, मासिकं वाचू देतात का?” जर त्याने “हो” म्हटलं तर तुम्ही त्याला वाचण्यासाठी साहित्य देऊ शकता आणि jw.org या आपल्या वेबसाईटला भेट द्यायला सांगू शकता.

एका किशोरवयीन मुलाने आवड दाखवली तर पुनर्भेटीत आपण त्याच्या पालकांना भेटलं पाहिजे. यामुळे आपल्या येण्याचा काय उद्देश होता आणि कुटुंबांसाठी बायबलमध्ये कोणता भरवशालायक सल्ला दिला आहे, हे आपण त्यांना दाखवू शकतो. (स्तो ११९:८६, १३८) आपण पालकांना आदर दाखवल्याने त्यांना चांगली साक्ष मिळते आणि त्यामुळे कदाचित आपल्याला त्या कुटुंबाला सुवार्ता सांगण्याच्या आणखी संधी मिळू शकतील.—१पेत्र २:१२.