व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—साक्ष देण्यासाठी संभाषणाची सुरुवात करणं

सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—साक्ष देण्यासाठी संभाषणाची सुरुवात करणं

शोमरोनी स्त्रीशी संभाषण सुरू केल्यामुळे येशूला अनौपचारिक रीत्या साक्ष देता आली. अनोळखी लोकांशी संभाषण सुरू करण्याचं कौशल्य आपण कसं वाढवू शकतो?

  • मैत्रीपूर्ण भावनेने लोकांशी बोला. येशू थकलेला होता पण तरी त्याने फक्‍त पाणी मागून संभाषणाची सुरुवात केली. त्याचप्रमाणे, आपणसुद्धा लोकांना नमस्ते म्हणून संभाषणाची सुरुवात करू शकतो. यासाठी कदाचित आपण हवामानाबद्दल किंवा एखाद्या चालू घडामोडीबद्दल बोलून सुरू करू शकतो. लक्षात असू द्या, की सुरुवातीला आपलं ध्येय फक्‍त संभाषण सुरू करणं हेच आहे आणि आपण यासाठी समोरच्या व्यक्‍तीला आवडत असलेल्या कोणत्याही विषयावर बोलू शकतो. पण जर त्या व्यक्‍तीने प्रतिसाद दिला नाही तर काही हरकत नाही. दुसऱ्‍या व्यक्‍तीशी संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न करा. धैर्यासाठी यहोवाकडे प्रार्थना करा.—नहे २:४; प्रेका ४:२९.

  • संभाषणादरम्यान योग्य संधी पाहून आनंदाचा संदेश सांगा पण त्यासाठी घाई करू नका. संभाषण ज्या दिशेने पुढे जात आहे तसंच ते पुढे चालू राहू द्या. जर आपण बळजबरीने सत्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्‍तीला अवघडल्यासारखं वाटेल आणि ती आपल्याशी बोलण्याचं बंद करेल. पण साक्ष देण्याआधीच जर आपलं संभाषण संपलं, तर निराश होऊ नका. संभाषण सुरू करून आनंदाचा संदेश सांगण्याची जर आपल्याला भीती वाटत असेल तर आपण काय करू शकतो? साक्ष न देण्याच्या हेतूने आपण संभाषणं सुरू करू शकतो. [व्हिडिओ क्र. १ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.]

  • आपल्या विश्‍वासाबद्दल मनापासून बोला आणि साक्ष देण्यासाठी संधी निर्माण करा. असं केल्याने ऐकणारी व्यक्‍ती स्पष्टीकरणासाठी पुढे प्रश्‍न विचारेल. येशूने उत्सुकता वाढेल अशी विधानं केली आणि त्यामुळे त्या स्त्रीला प्रश्‍न विचारण्यास प्रेरणा मिळाली. मग जेव्हा त्याने आनंदाचा संदेश सांगितला, तेव्हा त्याने फक्‍त त्या स्त्रीने विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरं दिली. [व्हिडिओ क्र. २ दाखवा व त्यावर चर्चा करा, आणि त्यानंतर व्हिडिओ क्र. ३ दाखवा व त्यावर चर्चा करा.]