व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

काहीही वाया गेलं नाही

काहीही वाया गेलं नाही

येशूने चमत्कारिक रीतीने ५,००० माणसांना, तसंच स्त्रियांना आणि मुलांना जेवू घातल्यानंतर आपल्या शिष्यांना सूचना दिली: “काहीही वाया जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा.” (योह ६:१२) काहीही वाया जाऊ न देता येशूने दाखवलं, की यहोवाने दिलेल्या गोष्टींबद्दल त्याला कदर होती.

आज, नियमन मंडळ संघटनेच्या कामासाठी असलेल्या साधनांचा सुज्ञपणे वापर करून येशूचं अनुकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. उदाहरणार्थ, न्यूयॉर्कमध्ये वॉरविक इथे जागतिक मुख्यालयाचं बांधकाम करताना बांधवांनी अशा डिझाइन्सची निवड केली, ज्यामुळे दिलेल्या दानाचा सर्वोत्तम उपयोग करणं शक्य झालं.

“काहीही वाया जाऊ नये” हे तत्त्व आपण पुढील क्षेत्रांत कसं लागू करू शकतो?