योग्य हेतूने येशूच्या मागे जा
जेव्हा येशूने शिष्यांना एक उदाहरण दिलं तेव्हा त्याच्या शिष्यांना ते समजायला अवघड गेलं आणि काही जण तर त्यामुळे अडखळले व त्यांनी येशूच्या मागे जाण्याचं सोडून दिलं. याच्या आदल्या दिवशीच येशूने चमत्कारिक रीत्या हजारो लोकांना जेवू घालून सिद्ध केलं की त्याच्याकडे असलेली शक्ती देवाकडून आहे. मग तरीही ते का अडखळले? खरंतर ते स्वार्थी हेतूने येशूच्या मागे जात होते. आपल्या शारीरिक गरजांसाठी ते येशूसोबत वेळ घालवत होते.
प्रत्येकाने स्वतःला विचारलं पाहिजे: ‘मी येशूच्या मागे का जात आहे? मुख्यतः मला आता आणि भविष्यात जे आशीर्वाद मिळणार आहेत त्यासाठी मी येशूच्या मागे जात आहे, की माझं यहोवावर प्रेम आहे आणि त्याचं मन आनंदित करण्याची माझी इच्छा आहे म्हणून मी येशूच्या मागे जात आहे?’
जर आपण खाली दिलेल्या कारणांसाठी मुख्यतः यहोवाची सेवा करत असू तर आपण का अडखळू?
-
आपल्याला देवाच्या लोकांसोबत राहायला आवडतं म्हणून
-
आपल्याला नंदनवनात राहायचं आहे म्हणून