येशूने आपल्या पित्याचा गौरव केला
येशूने त्याच्या वागण्या-बोलण्यातून आपल्या पित्याचा गौरव केला. त्याचा संदेश देवाकडून आहे हे लोकांना कळावं अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने शास्त्रवचनांच्या आधारावर शिकवलं आणि अनेक वेळा त्यांचा उल्लेखही केला. जेव्हा त्याची स्तुती व्हायची तेव्हा तो त्याचं श्रेय स्वतःला न देता पित्याला द्यायचा. यहोवाने दिलेलं काम पूर्ण करणं हे त्याचं मुख्य ध्येय होतं.—योह १७:४.
आपण पुढील बाबतीत येशूचं अनुकरण कसं करू शकतो?
-
बायबल अभ्यास घेताना किंवा मंचावरून शिकवताना
-
इतरांनी आपली स्तुती केल्यावर
-
आपला वेळ कसा घालवणार हे ठरवताना