व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

Justin Paget/​Stone via Getty Images

एकटेपणा झपाट्याने पसरतोय​—⁠यावर कशी कराल मात?

एकटेपणा झपाट्याने पसरतोय​—⁠यावर कशी कराल मात?
  •   “अमेरीकेतल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी आणि खासकरून तरुणांनी असं म्हटलंय, की त्यांना एकटेपणा जाणवतो.”​—आवर एपीडेमिक ऑफ लोनलीनेस ॲण्ड आयसोलेशन: द यू.एस. सर्जन जनरल्स ॲडवायसरी ऑन द हिलींग इफेक्ट्‌स ऑफ सोशल कनेक्शन ॲण्ड कम्यूनिटी, २०२३.

  •   “एकटेपणा आज गंभीर आणि मोठी आरोग्याची समस्या बनल्यामुळे [जागतिक आरोग्य संघटनेने] एक गट नेमलाय. एकटेपणावर तोडगा काढणं, लोकांना एकमेकांसोबत चांगले नातेसंबंध जोडायला मदत करणं आणि जगातल्या सर्व देशांमध्ये, मग ते गरीब असले तरी एकटेपणावर मात करायला वेगवेगळे मार्ग शोधणं हे या गटाचं काम आहे.”​—जागतिक आरोग्य संघटना, १५ नोव्हेंबर २०२३.

 इतरांसोबत चांगले नातेसंबंध जोडण्यासाठी बायबलमध्ये काही व्यावहारिक सल्ले दिले आहेत.

मदत करणारी बायबल तत्त्वं

 तुम्ही जास्त वेळ एकटे राहाल अशा गोष्टी करणं टाळा.  यात सोशल मिडियाचा जास्त वापर करणंही आलं, ते टाळा. त्याऐवजी प्रत्यक्षात लोकांना भेटायचा आणि मित्र बनवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.

  •   बायबलचं तत्त्व: “खरा मित्र नेहमी प्रेम करतो; दुःखाच्या प्रसंगी तो भावासारखा होतो.”​—नीतिवचनं १७:१७.

 इतरांना मदत करायच्या संधी शोधा.  इतरांसाठी काही केल्याने नातेसंबंध तर चांगले होतातच, पण त्यासोबतच आपल्यालाही बरं वाटतं.

 चांगले नातेसंबंध कसे जोडायचे याबद्दल बायबल आधारित उपयोगी माहिती तुम्हाला आमच्या वेबसाईटवर मिळेल.