व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

kovop58/stock.adobe.com

जागे राहा!

ऑलंपिकमुळे लोकांमध्ये खरंच एकता येऊ शकते का?—बायबल काय म्हणतं?

ऑलंपिकमुळे लोकांमध्ये खरंच एकता येऊ शकते का?—बायबल काय म्हणतं?

 २०२४ च्या ऑलंपिकमध्ये २०६ राष्ट्रांमधले खेळाडू भाग घेतील. एका अंदाजानुसार जवळपास ५ अब्ज लोक हे खेळ पाहतील. याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय ऑलंपिक कमिटीचे अध्यक्ष, थॉमस बाश म्हणाले: “संपूर्ण जगाला शांतीसाठी एकत्र करतो अशा कार्यक्रमाचा आम्ही भाग आहोत.” पुढे त्यांनी म्हटलं: “ऑलंपिक हे शांततेत जगण्याचा एक मार्ग आहे. आणि म्हणूनच, चला! आपल्या विविधतेत असलेली एकता आणि एक मानवजात या नात्याने आपण सर्वजण, जगाला शांततेत एकत्र आणणाऱ्‍या या ऑलंपिक उत्सवात सहभागी होऊ या!”

 पण अशी महत्त्वाकांशी ध्येयं ऑलंपिकमुळे खरंच साध्य होतील का? खरी शांती आणि ऐक्य खरोखर शक्य आहे का?

शांती आणि एकतेचं प्रतिक?

 या वर्षी होणारे ऑलंपिक हे आता फक्‍त खेळ राहिलेले नाहीत. खरंतर या खेळांमुळे लोकांमध्ये फुट पाडणारे सामाजिक आणि राजकीय वाद प्रकाशझोतात आले आहेत. यांमध्ये मानवाधिकार, वर्णभेद, धार्मिक विश्‍वासांमुळे होणारा भेदभाव आणि असमानता या गोष्टींचाही समावेश आहे.

 हे खरंए, की ऑलंपिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्‍या खेळांच्या आयोजनांमुळे लोकांचं मनोरंजन होतं. पण, यांमुळे शांती आणि एकता प्रस्थापित होण्याऐवजी, लोकांमध्ये फूट पाडणाऱ्‍या वृत्तीला आणि कृत्यांनाच बढावा मिळतो.

 आज लोकांमध्ये कोणत्या गोष्टींमुळे एकता येऊ शकत नाही, याबद्दल बायबलमध्ये आधीच सांगून ठेवलं आहे. (२ तीमथ्य ३:१-५) बायबलमध्ये सांगितलेल्या या भविष्यवाणीबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी इंग्रजीतला “डिड द बायबल प्रेडिक्ट द वे पिपल थिंक ॲन्ड ॲक्ट टुडे?” हा लेख वाचा.

जागतिक शांती आणि ऐक्यासाठी खरी आशा

 जगात खरी शांती आणि एकता कशी येईल याबद्दल बायबलमध्ये सांगितलंय. त्यात अभिवचन दिलंय की स्वर्गातल्या सरकाराद्वारे, म्हणजे ‘देवाच्या राज्यात’ पृथ्वीवरचे सगळे लोक शांती आणि एकतेत राहतील.—लूक ४:४३; मत्तय ६:१०.

 देवाच्या राज्याचा राजा, म्हणजे येशू ख्रिस्त या संपूर्ण जगात खरी शांती आणेल. बायबल म्हणतं:

  •   “त्याच्या शासनकाळात नीतिमानांची भरभराट होईल.”—स्तोत्र ७२:७.

  •   ‘तो साहाय्यासाठी हाक मारणाऱ्‍या गरिबांची . . . अत्याचारापासून आणि हिंसेपासून सुटका करेल.’—स्तोत्र ७२:१२, १४.

 खरंतर, आजही येशूच्या शिकवणींमुळे २३९ देशांमधले लाखो लोकांना एकत्र आले आहेत. आणि ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने, जगभरातले यहोवाचे साक्षीदार सर्वांसोबत शांतीने राहायला शिकले आहेत. हे कसं शक्य होऊ शकतं याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी टेहळणी बुरूज अंकातला “मनातून द्वेष काढून टाकणं खरंच शक्य आहे?” हा लेख वाचा.